Kalpana Kharat : भोंदू अशोक खरातच्या पत्नीला दिलासा, कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Kalpana Kharat : भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिला सिन्नरमधील कथित फसवणूक प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) दाखल गुन्ह्यात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Nashik Road Additional Sessions Court) तिला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार कोपळकर (Kedar Kopalkar) यांनी हा आदेश देताना आरोपीला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याची अट घातली आहे.



न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण


या प्रकरणात न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत तपास यंत्रणांचे आणि फिर्यादी पक्षाचे लक्ष वेधले. न्यायालयाच्या निदर्शनास आले की, संबंधित जमिनीचा व्यवहार तब्बल २००४ साली झाला होता. मात्र, या व्यवहाराबाबत तक्रारदार शिवराम माळी यांनी २२ वर्षांनंतर म्हणजे २०२६ मध्ये गुन्हा दाखल केला. एवढ्या मोठ्या कालावधीत फिर्यादी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी खरेदीखत रद्द करण्यासाठी अथवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कोणत्याही दिवाणी न्यायालयात दाद मागितली नसल्याची बाब न्यायालयाने विशेषत्वाने नमूद केली.


सुनावणीदरम्यान न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, व्यवहाराच्या वेळी फसवणूक करण्याचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचे तपासातून समोर आलेले नाही. संबंधित व्यवहार हा नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे पार पडलेला असून, मूळ स्वरूपाचा दिवाणी वाद गुन्हेगारी स्वरूपात रंगविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.



कल्पना खरातला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश


मात्र, अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने कल्पना खरातला (Kalpana Kharat) तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी बोलावल्यास चौकशीसाठी हजर राहणे आणि तपासात कोणताही अडथळा निर्माण न करणे या अटी न्यायालयाने घातल्या आहेत. त्यामुळे सिन्नरमधील या बहुचर्चित प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.



अशोक खरातविरोधात 7 जुलैला सुनावणी


दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भोंदू अशोक खरातविरोधातील दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. अशोक खरात याच्याविरोधात देवीशक्ती असल्याचा दावा करून महिला भाविकांची फसवणूक करणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, आर्थिक फसवणूक करणे, खंडणी उकळणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.


नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत त्याच्याविरोधात एकूण 17 गुन्ह्यांची नोंद असून, त्यापैकी 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात आहे. महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आठ गुन्ह्यांमध्ये यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 23) आरोपीविरोधातील दोन प्रकरणांची सुनावणी न्यायालयात होणार होती. मात्र, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

Comments
Add Comment

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Salman Khan : सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा; फेक चॅट्स, बनावट ओळख अन् १.३० लाखांचा व्यवहार

मुंबई : मुंबई पोलिसांनी सलमान खानला लक्ष्य करणाऱ्या एका कथित खंडणीच्या कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे . या

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा