Police Constable Suicide : सांगलीत २५ वर्षीय पोलीस हवालदाराची आत्महत्या; पोलीस दलात शोककळा

सांगली  : सांगली (Sangli) जिल्ह्यातील काडेगाव तालुक्यातील काडेपूर गावात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. कराड (Karad) शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या २५ वर्षीय पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Sangli Police Constable Suicide)


मृत पोलीस हवालदाराचे नाव आशुतोष अजित माने (Ashutosh Mane) असे असून ते कराड शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शांत, मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे ते सहकारी व मित्रपरिवारात लोकप्रिय होते.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आशुतोष माने यांनी काडेगाव येथील त्यांच्या राहत्या घराजवळ असलेल्या गोठ्यात आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिकांनी त्यांना तातडीने कडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.


घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.



या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली असून सहकाऱ्यांनी आशुतोष माने यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत.


Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :

Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली