कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो येथे सुरू आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका २३८ धावांनी पिछाडीवर आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने नऊ बाद ५०३ या धावसंख्येवर डाव घोषीत केला. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आठ बाद २६५ धावा केल्या आहेत. लाहिरू कुमार आठ धावांवर आणि सोनल दिनुशा ८५ धावांवर खेळत आहे.
Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शिस्तीचा बडगा कायम ठेवत आणखी एका ...
भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्यामुळे सामन्यातील भारताची बाजू वरचढ झाली आहे. रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. श्रीलंकेकडून लाहिरू उदाराने एक धाव, कामिल मिश्राने १९ धावा, प्रभात जयसूर्याने दोन धावा, पसिंदू सूरियाबंदाराने ८० धावा, कामिंदू मेंडिसने ३२ धावा, धनंजय डी सिल्वाने आठ धावा, निरोशन डिकवेलाने शून्य धावा, केशरा नुवान्थाने १८ धावा एवढे योगदान दिले आहे.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळही वाद आणि नाट्यमय घडामोडींनी गाजला. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल ...
दिनुशाने भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेतले तिसरे अर्धशतक झळकावले आहे. तो सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता दिनुशा तळाच्या फलंदाजांसोबत किती वेळ खेळतो यावर श्रीलंका केवढी मजल मारणार हे स्पष्ट होणार आहे.
भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवने आंतरराष्ट्रीय ...
दिनुशा व्यतिरिक्त श्रीलंकेकडून पसिंदू सूरियाबंदारा हा एकच खेळाडू भारतीय गोलंदाजांसमोर उभा राहू शकला. इतर फलंदाजांना जास्त काळ टिकणे जमले नाही. यामुळे भारताला लंकेवर दबाव वाढवणे सोपे झाले. भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकला आहे. गॉल येथे झालेला हा सामना भारताने १६५ धावांनी जिंकला. आता कोलंबो कसोटीतही सध्या भारताची स्थिती उत्तम दिसत आहे. जर कोलंबोत विजय झाला तर भारत मालिका २-० अशी जिंकणार आहे.