Prajakta Lavangare : प्राजक्ता लवंगारे यांनी स्वीकारला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी )


प्राजक्ता लवंगारे (Prajakta Lavangare) यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार बुधवारी २४ जून २०२६ रोजी सकाळी स्वीकारला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांच्या बदलीनंतर त्यावर आधारित स्थगिती उठवल्यानंतर पुन्हा त्यांची बदलीचे आदेश प्राप्त झाले.त्यांची बदली एमएमआरडीए महानगर अतिरिक्त आयुक्तपदी झाली. या रिक्त जागी लवंगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


प्राजक्ता लवंगारे (Prajakta Lavangare) यांचे बी. ए (इंग्रजी), एल. एल. बी (अॅडमिनिस्ट्रेटीव्ह अँड अदर लॉ), एम. ए (ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट) पदवीचे शिक्षण झाले आहे. तसेच, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायन्समधून एम. एसस्सी (अर्बन स्टडीज) पदवी प्राप्त केली आहे.



प्राजक्ता लवंगारे (Prajakta Lavangare) या भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २००१ च्या तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात अहिल्यानगर (तत्कालिन अहमदनगर) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली. त्यानंतर, धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि सहआयुक्त (चौकशी), सचिव (मराठी भाषा विभाग) या पदांवर काम केले. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त पदावरही त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे, नागपूर विभागाच्या त्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त होत्या. दरम्यान, त्या केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीने वस्त्रोद्योग मंत्रालयात सह सचिव आणि अणूऊर्जा विभागात सह सचिव तथा अतिरिक्त सचिव या पदावर कार्यरत होत्या.



प्राजक्ता लवंगारे (Prajakta Lavangare) यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विस्थापित झालेल्या १० गावांच्या जमीन संपादन व पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रभावित नागरिकांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन आणि समाजाचा विश्वास कायम राखत हा प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेला. सन २०२५ मध्ये सिंगापूर येथे पार पडलेल्या आयटीएमए सस्टेनिबिलिटी फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना वस्त्रोद्योगातील हरित परिवर्तन आणि चक्रीय अर्थव्यवस्थेबाबत (सर्क्यूलर इकॉनॉमी) भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली. ‘कस्तुरी कॉटन’ या उपक्रमाच्या प्रारंभात महत्त्वपूर्ण योगदान देत स्वदेशी आणि उच्च दर्जाच्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन दिले. तसेच, वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असताना त्यांनी माहिती आदान-प्रदान प्रणाली (डेटा-शेअरिंग इंटरफेसेस) विकसित करून विविध क्षेत्रांतील मोठ्या प्रमाणावरील करचुकवेगिरी उघडकीस आणण्यास मदत केली. मराठी भाषा विभागाच्या सचिवपदाच्या कार्यकाळात मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय उपक्रमांची सुरुवात केली. तसेच, अहिल्यानगर येथे महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे नेतृत्व करून महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीस प्राजक्ता लवंगारे (Prajakta Lavangare) यांनी चालना दिली. (Prajakta Lavangare)




[caption id="attachment_1036632" align="alignnone" width="1600"] Prajakta Lavangare BMC[/caption]
Comments
Add Comment

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक