Vidya Balan : ओंकार भोजनेच्या डायलॉगवर विद्या बालनची रील; ‘हास्यजत्रा कलाकारांनीही' केल्या भन्नाट कमेंट्स

Vidya Balan : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांचाच नाही, तर बॉलीवूड कलाकारांचाही आवडता ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशातच अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) हास्यजत्रेतील ओंकार भोजनेच्या एका गाजलेल्या स्किटमधील डायलॉगवर रील बनवला आहे. विद्या बालन अनेक वेळा कॉमेडी रील्स सोशल मीडियावर शेअर करत असतात.


अनेक वेळा भाऊ कदम यांच्या कॉमेडी व्हिडिओजवरही रील्स बनवल्या आहेत. आता विद्या बालनने हास्यजत्रेतील अभिनेता ओंकार भोजनेच्या लोकप्रिय डायलॉगवर रील बनवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विद्या बालनने तिच्या सोशल मीडियावर ओंकार भोजनेच्या 'अगं अगं आई' या गाजलेल्या प्रहसनातील डायलॉगवर आधारित एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला. "एवढेच हवे आहे जगण्यासाठी... हा हा हा हा!" असे कॅप्शन देत तिने ही रील पोस्ट केली असून ती सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



विद्याही म्हणते, काय लागतं जगण्यासाठी ?


या रीलमध्ये विद्या, "काय लागतं जगण्यासाठी? अन्न, वस्त्र, निवारा... बस्स! टीव्ही लागतो, फिरायला बाईक लागते, बाईकमध्ये पेट्रोल लागतं, रिचार्ज करायला पैसे लागतात, जेवायला चायनीज लागतं... बापरे! लई काय काय लागतंय!" हा लोकप्रिय संवाद आपल्या खास अंदाजात सादर करताना दिसत आहे.



हास्यजत्रा कलाकारांच्या भन्नाट कमेंट्स


विद्याच्या या व्हिडिओवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. नम्रता संभेरावने हसण्याचे इमोजी पोस्ट करत आनंद व्यक्त केला, तर सई ताम्हणकरने "Yayyy Ma'am" अशी कमेंट केली. प्रियदर्शनी इंदलकरसह अनेक कलाकारांनीही या रीलचे कौतुक केले आहे. विद्या बालन सोशल मीडियावर अशा विनोदी रील्ससाठी ओळखली जाते. यापूर्वीही तिने मराठी कॉमेडी कलाकारांच्या स्किट्सवर व्हिडिओ बनवले आहेत. त्यामुळे ओंकार भोजनेच्या डायलॉगला दिलेल्या तिच्या या हटके टचमुळे चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत