मुंबई : मुंबईतील ससून डॉकच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज फिनलंडच्या उप-महावाणिज्यदूत श्रीमती इव्हा निल्सन तसेच Mirasys कंपनीचे प्रतिनिधी श्री. अरिंदम सरकार यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली. यावर्षीच्या सुरुवातीला मुंबईतील फिनलँड वाणिज्य दूतावासासोबत झालेल्या ससून डॉक्स विकासासंदर्भातील सामंजस्य कराराचा (MoU) आढावा यावेळी घेण्यात आला. ससून डॉक्सच्या आधुनिकीकरण व विकासकामांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या तात्काळ कारवाईने आरोपीला २४ तासाच्या आत अटक Mumbai Local Train Murder Case : मुंबई: मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमध्ये (Local Train) किरकोळ वादातून झालेल्या ...
या बैठकीस महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MFDC) चे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश खापले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत ससून डॉक परिसरात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, स्मार्ट ऑपरेशन्स, पर्यावरणीय व्यवस्थापन, ब्लॉकचेन आधारित दस्तऐवज पडताळणी आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. सुमारे १८० पीटीझेड, बुलेट आणि एएनपीआर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचे निरीक्षण, केंद्रीकृत व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टम (VMS) आणि निर्णय सहाय्यक बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.यामुळे ससून डॉक परिसरातील सुरक्षा अधिक बळकट होण्यास मदत होणार असून बोटींची हालचाल, वाहन व्यवस्थापन, गर्दीचे विश्लेषण आणि अपघात प्रतिबंधासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार आहे. तसेच डिजिटल लिलाव प्रणाली, पुरवठा साखळी व्यवस्थापन, मोबाईल अॅप आधारित सेवा आणि सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यवहार अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला.
Cyber Attack News : जग डिजिटल झालं. मोबाईलमुळे कितीतरी कामे सोपी झाली. मोबाईलमुळे जग जवळ आलं खरं पण काळजी घेतली नाही तर याच मोबाईलमुळे अनेकांना लाखोंचा भुर्दंड ...
पर्यावरणीय दृष्टीने स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि त्यावरील देखरेखीसाठी आधुनिक प्रणाली विकसित करण्याबाबतही चर्चा झाली. याशिवाय ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बोट परवाने, कामगार ओळखपत्रे आणि निर्यात दस्तऐवजांची जलद व सुरक्षित पडताळणी करण्याची व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.कामगार आणि अभ्यागत व्यवस्थापनासाठी फेस रिकग्निशन, आरएफआयडी, बायोमेट्रिक प्रणाली, डिजिटल उपस्थिती आणि प्रवेश नियंत्रण यंत्रणा उभारण्यावरही विचार करण्यात आला. या उपाययोजनांमुळे सुरक्षा वाढण्याबरोबरच प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहेत.
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या अंमलबजावणीबाबत विधानपरिषदेत झालेल्या चर्चेत ...
या प्रकल्पासाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क, आधुनिक सर्व्हर रूम, वाय-फाय/लॅन सुविधा आणि अत्याधुनिक कंट्रोल रूमचा समावेश आहे. सर्व प्रणाली एकात्मिक डॅशबोर्डवर कार्यरत राहतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील मत्स्यव्यवसाय आणि बंदर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून महाराष्ट्राला या क्षेत्रात देशात अग्रस्थानी आणण्याचा निर्धार व्यक्त केला. ससून डॉकसारख्या महत्त्वाच्या मत्स्यबंदरांचे आधुनिकीकरण केल्यास मच्छीमारांना अधिक सुविधा, सुरक्षितता आणि व्यवसाय वृद्धीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.फिनलंडच्या प्रतिनिधींनीही महाराष्ट्र सरकारसोबत तांत्रिक सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. या चर्चेमुळे ससून डॉकच्या सर्वांगीण आधुनिकीकरणाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.





