Mumbai Local Train Murder Case: मुंबई लोकलमधील थरारक हत्याकांडाचा उलगडा; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई पोलिसांच्या तात्काळ कारवाईने आरोपीला २४ तासाच्या आत अटक 


Mumbai Local Train Murder Case : मुंबई: मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमध्ये  (Local Train) किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी रोशन सुवर्णा याला अटक केली आहे. आरोपीला कुर्ला परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Local Train Murder)



नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? 


मंगळवारी रात्री जोगेश्वरी ते मालाड स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. पावसाचे पाणी डब्यात येत असल्याने ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी रोशन सुवर्णा याने २२ वर्षीय मयंक लोहार याच्यावर चाकूने हल्ला केला.



मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या बॅगेतून मोठा चाकू काढून मयंकच्या छातीत आणि कंबरेवर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा (Mayank Lohar) मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला.


घटनेनंतर आरोपी बोरिवली स्थानकावर उतरून फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी त्याचा माग काढला. आरोपीच्या शोधासाठी सात विशेष पथके तयार करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळवले. आरोपीला पोलिसांनी कुर्ला येथून ताब्यात घेतले.



मृत मयंक लोहार हा विरार येथील रहिवासी होता. त्याने फायनान्स मार्केटिंगचे शिक्षण घेतले होते आणि गेल्या नऊ महिन्यांपासून अंधेरी परिसरातील एका खासगी संस्थेत नोकरी करत होता. नोकरीसाठी तो दररोज विरार ते अंधेरी असा प्रवास करत होता.


मयंकच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण आणि दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, आरोपीची सखोल चौकशी सुरू असून या हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून