Cyber Attack News : व्हॉट्सॲपवर आलेली 'वेडिंग इन्व्हिटेशन' फाईल ओपन करताय ? थांबा, नाहीतर... निवृत्त शिक्षिकेला पावणेचार लाखांचा गंडा

Cyber Attack News : जग डिजिटल झालं. मोबाईलमुळे कितीतरी कामे सोपी झाली. मोबाईलमुळे जग जवळ आलं खरं पण काळजी घेतली नाही तर याच मोबाईलमुळे अनेकांना लाखोंचा भुर्दंड बसला आहे. सध्या लग्नपत्रिका या व्हॉट्सॲपवर (WhatsApp) अनेकजण पाठवत आहे. पण याचाच फायदा अनेक भामट्यांनी उचलण्यास सुरुवात केली आहे आणि याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.



सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवलेली ‘वेडिंग इन्व्हिटेशन’ नावाचे घातक ॲप्लिकेशन डाऊनलोड करणं भुसावळातील (Bhusawal) एका सेवानिवृत्त शिक्षिकेला पुरते अंगाशी आले आहे. क्षणार्धात मोबाईल हॅक करून सेवानिवृत्त शिक्षिकेच्या बँक खात्यातून तब्बल ३,८८,३२७ रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bhusawal Bazar Peth Police Station) अज्ञात सायबर चोराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


मुनिझा कौसर फरीद खान पठाण (वय ६३, रा. गडकरीनगर, भुसावळ) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त महिला शिक्षिकेचे नाव असून त्या त्यांच्या गडकरीनगर येथील राहत्या घरी असताना, गेल्या १२ एप्रिलच्या रात्री ११ ते १३ एप्रिलच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात सायबर गुन्हेगाराने त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर 'wedding invitation.apk' नावाची एक फाईल पाठवली. ओळखीच्या कोणाचे तरी लग्नाचे निमंत्रण असावे, असा समज मुनिझा कौसर फरीद खान पठाण यांचा झाला आणि तिथेच त्या फसल्या.



फाईल ओपन डाऊनलोड करताच सायबर चोरांनी त्यांचा संपूर्ण मोबाईल हॅक केला. मोबाईलचा ताबा मिळवताच भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यात प्रवेश करून टप्प्याटप्प्याने तब्बल ३,८८,३२७.०१ रुपये लंपास केलेत. सवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, मुनिझा खान यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. त्यानुसार २३ जून रोजी दुपारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bazarpet Police Station) भा.न्या.सं. कलम ३१८(४) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मंडळी काळजी घ्या जरा


सध्या लग्नसराई आणि कार्यक्रमांच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर '.apk' फॉरमॅटमधील फाईल्स पाठवून मोबाईल हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. अज्ञात क्रमांकावरून आलेली कोणतीही फाईल डाऊनलोड करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे (Bazarpet Police Station)पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे पुढील तपास करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी