Tata Institute in Deonar : देवनारमध्ये टाटा संस्थेच्यावतीने कौशल्य विकासाचे धडे

- महापालिकेच्यावतीने सहा मजली इमारत संस्थेला भाडेतत्वावर देणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : देवनारमधील तळ अधिक सहा मजला इमारतीची जागा आता टाटा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल (Tata Institute in Deonar) या संस्थेला भाडेतत्वावर दिली जाणार आहे. या संस्थेला पाच रुग्ण चौरस फुट दराने ही जागा अकरा महिन्याच्या कालावधीसाठी २० वर्षांकरता भाडेकरारावर दिली जाणार आहे. यामाध्यमातून देवनारध्ये टाटा संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे धडे दिले जाणार आहे. यामध्ये ए.आय.सह रोबोटिक वेल्डींग, व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Tata Institute in Deonar)


देवनार येथील तळमजला अधिक ६ मजल्याची इमारत ज्यांचे एकूण क्षेत्रफळ १६३.१२ चौ.मी असे असून याची बांधीव सुविधा ही कौशल्य विकास केंद्राकरीता आरक्षित असलेल्या जमिनीवर उपलब्ध झाली आहे. ही बांधिव इमारत येथील जय मातादी हौसिंगमार्फत आरक्षित सुविधांतर्गत महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. ही बांधीव इमारत एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी महापालिका संचालक नियोजन यांना हस्तांतरीत झाला आहे. ही इमारत ही कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी वापर होण्याकरिता आरक्षित आहे. याठिकाणी अणशक्ति नगर आणि आसपासच्या परिसरातील युवकांसाठी प्रशिक्षण व उपजिवीकेच्या संधी होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. (Tata Institute in Deonar)



त्यामुळे इमारतीच्या जागेत टाटा इंडियन इंस्टिटयूट ऑफ स्किल या संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांच्या निवासासह सुरु करण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जागा किमान भाडे तत्वावर प्रति चौ. फुट दरमहा ५ रुपये या दराने अटी व शर्तीसापेक्ष जागा प्रथमतः ११ महिन्यांसाठी आणि त्यापूढे प्रत्येक ११ महिन्यांनी इतर कोणतीही प्रक्रिया न करता असे २० वेळा नूतनीकरण करण्यासापेक्ष भाडयाने देण्याचा निर्णय घेतला आहे. (Tata Institute in Deonar)



टाटा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल या संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राद्वारे फॅक्टरी ऑटोमेशन, ऍडेक्टीव्ह मॅन्युफॅक्चरींग, मेकॅट्रोनिक्स, रोबोटिक्स, ए.आय., रोबोटिक वेल्डींग, इलेक्ट्रिक मोबीलीटी इत्यादी क्षेत्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध क्षेत्रातील खाजगी कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थीना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Tata Institute in Deonar)

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून