- बोगस डाॅक्टर्सच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहाचे आरोग्य बिघडले; महापालिका सभागृहाची एकमुखी मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या व्हि.एन. देसाई रुग्णालयातील कंत्राटी बोगस डॉक्टरच्या (Bogus Doctors) भरतीवरून महापालिका सभागृहात सर्वच नगसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आयसीयूसह इतर कंत्राट देताना संबंधित संस्थेच्या माध्यमातून डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची पडताळणी न करताच त्यांची सेवा घेतली जात आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या बोगस डॉक्टरांवर तसेच संबंधित संस्थेवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मुंबईतील सर्व झोपडपट्टीसह इतर दवाखान्यांमधील डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सभागृहाने केली आहे. दरम्यान, बोगस डॉक्टसची नेमणूक करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे प्रशासनाने निवेदनात स्पष्ट केले आहे. (Bogus Doctors)
मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्ही.एन.देसाई रुग्णलयामधील डॉक्टराच्या बोगस भरतीबाबतचा मुद्दा निवेदनाद्वारे उपस्थित करत महापालिका रुग्णालयात रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा खासगी कंत्राटदारामार्फत डॉक्टर्स, नर्सेस व सुरक्षा रक्षक यांची भरती न करता प्रशासनामार्फत तज्ज्ञ डॉक्टर्सची व इतर कर्मचाऱ्यांची मागणी केली. तसेच व्ही.एन देसाई रुग्णालयात उघडकीस आलेल्या बोगस डॉक्टर प्रकरणी या घटनेला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावरील चर्चेत भाग घेताना यामिनी जाधव यांनी रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस यांची खासगी संस्थेच्या वतीने नेमणूक ज्याने केली आहे, त्याला रुग्णांचे शाप लागतील असे स्पष्ट केले. तर डॉ सईदा खान यांनी आज कायम कामगार दोन तास तर बहुउद्देशीय काम करणारा कंत्राटी कामगार हा बारा तास सेवा देतो असे सांगितले. त्यामुळे जेवढे बोगस डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. तसेच अशा डॉक्टरांची नेमणूक करता अशा संस्थांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली. (Bogus Doctors)
महापौर आणि आयुक्तांनी खरेदी केल्या छत्री मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या सहकार्याने आणि ‘दि नॅशनल असोसिएशन ऑफ डिसएबल्ड ...
भाजपच्या डॉ अर्चना भालेराव यांनी मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीशिवाय डॉक्टरांची सेवा महापालिकेच्या आरोग्य विभागात घेतलीच कशी जाते असा सवाल करत अशाप्रकारे जर कुणाची नेमणूक झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. उबाठाच्या श्रध्दा जाधव यांनी मुंबईतील सर्व डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची चौकशी व्हावी आणि ज्यांची कंत्राटी तत्वावर भरती झाली असेल तर त्या सर्वांची माहिती मिळावी. (Bogus Doctors)
शिवसेनेच्या डॉ अदिती खुरसुंगे यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची सेवा घेताना ते महाराष्ट्रातीलच घेतले जावे. कारण आज कुठल्याही डॉक्टरांची सेवा घेतली जात आहे.आज एक बोगस डॉक्टर आढळून आला आहे, उद्या आणखी बोगस डॉक्टर आढळून येतील. एवढेच नाही तर डॉक्टरांची सेवा ही कंत्राटी तत्वावर घेतली जावू नये अशीही मागणी केली. तसेच दहा दहा वर्षे कंत्राटी तत्वावर सेवा देवूनही त्यांना कायम केले जात नाही. त्यामुळे ज्या कंत्राटी डॉक्टरांची पाच पेक्षा अधिक वर्षे सेवा झाली असेल तर त्यांना महापालिकेत कायमपदी सामावून घ्यावे. अन्यथा हेही डॉक्टर उद्या सोडून जातील आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा द्यायला डाॅक्टर्स नसतील अशी भीती व्यक्त केली. (Bogus Doctors)
- दोन वर्षांसाठी तब्बल १४२ कोटी रुपयांचा केला जाणार खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडत असून या ...
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खासगी संस्थेच्या माध्यमातून कंत्राटी डाॅक्टरांची सेवा देण्याची प्रथा ही यापूर्वीच्या निवृत्त प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ सिमा मलिक यांच्या काळात सुरु झाल्याचा आरोप भाजपचे प्रविण छेडा यांनी केला. तर शिवसेनेच्या सई शिर्के यांनी विक्रोळीतील संत मुक्ताबाई रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस ही सर्व पदे सध्या कंत्राटी पध्दतीवरच असून बऱ्याचदा महिलांना केईएम किंवा शीव रुग्णालयांमध्ये मोठ्या उपचारासाठी दाखल केले जाते. महापालिकेत प्रामाणिक डॉक्टरची कदर केली जात नसून केईएम रुग्णालयात सन २००६ पासून आजवर सहायक अधिष्ठाता या एकाच पदावर डॉक्टर प्रविण बांगर हे आहेत. पण त्यांना २० वर्षांत एकही पदोन्नती देण्यात आलेली नाही, अशी माहिती देत उबाठाचे सचिन पडवळ यांनी कंत्राटी पध्दतीवर जर डॉक्टर्स घेण्याऐवजी कायम पदावर डॉक्टर्सची सेवा घेतली जावी, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी सहायक प्राध्यापकापासून ते नर्सेस पर्यंची रिक्तपदांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. (Bogus Doctors)
यावरआरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांन बोगस डॉक्टर्सची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतानाच डायलेसीस सेंटरमधील घोटाळाच मांडला. २५ मार्च २०१६ मध्ये डायलेसिसची पाटी लावली पण तिथे ही सेवाच तिथे दिली जात नाही,असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत अश्रफ आझमी,अंकित प्रभु, जमीर कुरेशी आदींनी भाग घेतला. (Bogus Doctors)
संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकले - डॉ.विपीन शर्मा
महापालिका प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना डॉ विपीन शर्मा यांनी सन २० १६ ते २०१८ अशप्रकारे कंत्राट दिले होते, पुढे तीन वेळा मुदतवाढ दिली गेली आहे. संजीवनी संस्थेचा विषय हा देसाई रुग्णालयातील बोगस डॉक्टरसंदर्भात आहे. याबाबत तक्रार आल्यानंतर त्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आणि त्यांचे पेमेंट थांबवण्यात आले आहे. डॉक्टर व्हेरीफिकेशनची जबाबदारी संबंधित संस्थेची होती. त्यामुळे नियमांचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई केली होती. तसेच आरोग्यासंदर्भात उपनगराचे पालकमंत्री यांना जे सादरीकरण केले होते, त्यानुसार महापालिका सभागृहाला आम्ही सादरीकरण देवू. ज्यामध्ये यासर्वांचे सविस्तर निवेदन आम्ही सादर करायला तयार आहे. नवीन वास्तू पीपीपी तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही हे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी महापालिका सभागृहात येईलच असे सभागृहात निवेदनाद्वारे स्पष्ट केले. (Bogus Doctors)




