BMC News : पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबईत ५४७ पंप

- दोन वर्षांसाठी तब्बल १४२ कोटी रुपयांचा केला जाणार खर्च


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडत असून या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुढील दोन वर्षांकरता पंप बसवण्यात येणार आहे. . पुढील दोन वर्षांसाठी तब्बल १४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मागील वर्षी ४८१ पंप बसवण्यात आले होते, तर यंदा हे आता ५४७ पंप बसवले जाणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६६ पंपांची वाढ झाली आहे. (BMC News)


मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे, पावसाचे पाणी सखल भागात जमा होते व त्याचा निचरा होत नाही. अशा साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे जवळपासच्या वस्तीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते व त्याचा वहानांच्या रहदारीवर तसेच जनजीवनावर परिणाम होतो, म्हणुन मुंबई महानगरपालिका अशा सखल भागातील पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मागील १६ वर्षांपासून पाण्याचा उपसा करणारे पपं बसवण्याची व्यवस्था करीत आहे. मुसळधार पावसात साचलेले पाणी या पंपांद्वारे जवळपासच्या नाल्यात, मलनिःसारण वाहिन्यांमध्ये तसेच पर्जन्य जल वाहिनीत सोडले जाते. (BMC News)



मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमध्ये आणि राजे एडवर्ड व लोकमान्य टिळक ही दोन मोठी रुग्णालये आदी परिसरांमध्ये हे पंप बसवले जाणार आहेत..


सन २०२५मध्ये विविध ठिकाणी ४८१ पंप भाडेतत्वावर घेण्यात आले होते. त्यानंतर आता सन २०२६ व सन २०२७ या कालावधीसाठी ५४७ पंप बसवण्यात येणार आहे. या दोन वर्षांसाठी सुमारे १४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (BMC News)



महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार. महापालिका प्रशासनाच्यावतीनउदंचन संचाच्या कार्यावर प्रभावीपणे देखरेख ठेवण्याकरीता तसेच पारदर्शकता प्राप्त करण्याकरीता प्रत्येक उदंचन संचावर आय. ओ.टी उपकरण बसविण्यात येणार आहे. या पंपांचीचालु व बंद माहिती आय.ओ.टी उपकरणाद्वारे थेट मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पी.एम.एस. या प्रणालीवर पाठविण्यात येईल. तसेच प्रत्येक पंपांवर बसविलेल्या ठिकाणी नेमून दिलेल्या कामगार वर्गाच्या भ्रमणध्वनीला भू-कुंपण केले जाईल. अशाप्रकारे भ्रमणध्वनींचे भू-कुंपण केल्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचा उपस्थिती अहवाल थेट एका ऍपद्वारे प्राप्त होणार आहे. अशाप्रकारे आय.ओ.टी उपकरण व भू-कुंपण यांचा वापर पंपांच्या कार्यावर देखरेख ठेवण्याकरीता प्रथमच मुंबई हानगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहे. (BMC News)

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून