LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग


नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकिस्तानला मोठा फटका दिल्यानंतर सीमारेषेवरील (LOC News) घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने युद्धजन्य भाषा वापरली जात असताना आता नियंत्रण रेषेवर (LoC) मोठ्या प्रमाणात सैन्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची तैनाती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (LOC News)


सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या आठ ब्रिगेडनी एलओसी परिसरात ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात केली आहेत. लेझर तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या युनिट्सचे मुख्य उद्दिष्ट संभाव्य हवाई हल्ले आणि ड्रोन घुसखोरी रोखणे हे आहे. याशिवाय पाकिस्तानने सीमावर्ती भागात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फेन्सिंग उभारून निगराणी आणि लक्ष्य शोधण्याची क्षमता वाढवली आहे. (LOC News)


पाकिस्तानने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर-ड्रोन ग्रिडही विकसित केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तान सीमेवर तैनात असलेल्या पाच बटालियन या महिन्याच्या सुरुवातीला हटवून त्यांना एलओसीलगतच्या रावलाकोट आणि कोटली भागात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात लष्करी हालचाली वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (LOC News)



ऑपरेशन सिंदूरचा फटका अद्याप कायम :


भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या हवाई तळांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. नूर खान, मुरीद, भोलारी, सरगोधा, जेकोबाबाद, सुक्कुर आणि रहीमयार खान यांसारख्या एअरबेसवरील इंधन साठे आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त होते. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले जात आहे. (LOC News)


याशिवाय पाकिस्तान वायुदल बलुचिस्तानमधील नसीराबाद जिल्ह्यातील नोताल आणि खैबर पख्तूनख्वातील मानसेहरा येथे नवीन हवाई तळ उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यामुळे भविष्यातील संरक्षण क्षमता मजबूत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. (LOC News)



तुर्कस्तान आणि चीनची मदत :


दरम्यान, पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रात तुर्कस्तान आणि चीनकडूनही मोठी मदत मिळत आहे. कराचीजवळ तुर्कस्तानच्या सहकार्याने कॉम्बॅट ड्रोन असेंबली प्लांट उभारण्यात आला असून, येथून दरवर्षी सुमारे ७०० ड्रोन तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या ड्रोनच्या निर्यातीसाठी पाकिस्तानने बांगलादेशासोबत सामंजस्य करार (MoU) केल्याचीही माहिती आहे. (LOC News)



तुर्कस्तानकडून पाकिस्तानसाठी मिलजेम श्रेणीतील अत्याधुनिक पाणबुडीची निर्मिती सुरू असून ती यावर्षाअखेरीस पाकिस्तानला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चीननेही पाकिस्तानला मल्टी-रोल जे-सीरिजच्या ३६ लढाऊ विमानांचा पुरवठा केल्याचे वृत्त आहे. तसेच भविष्यात अमेरिकेच्या एफ-३५ च्या धर्तीवर विकसित करण्यात आलेले चिनी जे-३५ फायटर जेटही पाकिस्तानच्या ताफ्यात दाखल होऊ शकते. दक्षिण आशियातील कोणत्याही देशाकडे सध्या पाचव्या पिढीचे लढाऊ विमान नसल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (LOC News)


सीमेवरील वाढत्या हालचाली आणि संरक्षण क्षमतेत होत असलेल्या बदलांमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)