Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (JSCA) आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ३५ प्रेक्षक जखमी झाले. अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमकडे धाव घेतल्याने प्रवेशद्वारांवर प्रचंड गर्दी झाली आणि त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.


माहितीनुसार, अंतिम सामना पाहण्यासाठी दुपारपासूनच प्रेक्षक स्टेडियम परिसरात जमा होऊ लागले होते. सामना सुरू होण्यापूर्वीच हजारो चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. मात्र, सुरक्षा तपासणी आणि प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने गेटबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. प्रतीक्षा वाढत गेल्याने प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि धक्काबुक्की सुरू झाली. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. (Jharkhand T20 League)



या घटनेत जखमी झालेल्या ३५ जणांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारासाठी अनेकांना स्टेडियममधील मीडिया गॅलरीजवळ उपचार देण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Jharkhand T20 League)



बॅरिकेडिंग तोडून प्रेक्षकांचा प्रवेशाचा प्रयत्न :


प्रवेशासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने संतप्त झालेल्या काही प्रेक्षकांनी वेस्ट गेटवरील बॅरिकेडिंग तोडले. त्यानंतर स्टेडियम परिसरात एकच गोंधळ उडाला. वेस्ट गेटनंतर नॉर्थ गेट आणि एमएस धोनी पॅव्हेलियन परिसरातही प्रेक्षकांनी गर्दी करत गोंधळ घातल्याचे सांगितले जात आहे. काहींनी बंद गेट तोडण्याचाही प्रयत्न केला. अखेर गेट उघडताच हजारो लोक एकाचवेळी आत धावल्याने अनेक जण पडले आणि त्यांना दुखापती झाल्या. (Jharkhand T20 League)



आयोजकांच्या नियोजनावर टीका :


स्थानिक नागरिक आणि प्रेक्षकांनी या घटनेसाठी आयोजकांच्या अपुऱ्या नियोजनाला जबाबदार धरले आहे. अंतिम सामना पाहण्यासाठी सुमारे ३० हजारांहून अधिक प्रेक्षक येणार असल्याचा अंदाज असूनही पुरेशी सुरक्षा, गर्दी नियंत्रणाची यंत्रणा आणि प्रवेश व्यवस्थेची आखणी करण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य वेळी गर्दीचे व्यवस्थापन केले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिली. (Jharkhand T20 League)



घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. या घटनेनंतर स्टेडियममधील सुरक्षा व्यवस्थेवर आणि आयोजकांच्या तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Jharkhand T20 League)

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि

Melody Tiramisu Flavour : 'मेलोडी'चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या 'त्या' गिफ्टवरून पारलेने लाँच केला 'Melody Tiramisu'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

CJP Protest Case : 'गुन्हेगारांना सोडणार नाही'; CJP आंदोलन प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट विधान

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना