#HBDNiteshRane : सोशल मीडियावर मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचा बोलबाला

- 'ट्विटर'वर हॅशटॅग प्रथम क्रमांकावर; राजकीय नेत्यांसह नेटिझन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव


मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन विविध राजकीय घडामोडींनी गाजत असतानाच, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकाळपासूनच 'एक्स'वर नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्तचा विशेष हॅशटॅग भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावरील या ट्रेंडसोबतच विधानसभेतही मंत्री राणे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष अभिनंदन करण्यात आले. सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (#HBDNiteshRane)



'एक्स' प्लॅटफॉर्मवरील भारतीय ट्रेंड्सच्या यादीमध्ये #HBDNiteshRane हा हॅशटॅग प्रथम क्रमांकावर पोहोचला. राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या राजकीय ट्रेंड्सना मागे टाकत नितेश राणे यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हा डिजिटल कौतुकसोहळा घडवून आणला. कोकणासह राज्यभरातून त्यांच्या हजारो चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विविध भाषणांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर करत या हॅशटॅगसह शुभेच्छांचा पाऊस पाडला. (#HBDNiteshRane)



दुसरीकडे, विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाची माहिती सभागृहाला देत, त्यांचे प्रथेप्रमाणे अभिनंदन केले. विधानसभेची लॉबी आणि दालनात अनेक आमदार आणि मंत्र्यांनी त्यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (#HBDNiteshRane)




Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून