अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या नव्या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप: सच या सजा’ ( Lock Up Sach Ya Saza) या शोच्या दुसऱ्या पर्वाच्या लाँच कार्यक्रमात घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर रितेशने नाराजी व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडली. (Entertainment News Marathi)
पत्रकाराने विचाराला प्रश्न अन्...
शोच्या लाँच कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद सुरू असताना एका पत्रकाराने रितेशला सलमान खान आणि संजय दत्त यांच्याबाबत प्रश्न विचारला. या दोघांना तुरुंगवासाचा अनुभव असल्याने त्यांना ‘लॉक अप’ शोमध्ये आणाल का आणि त्यांना कोणती शिक्षा द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न रितेशला आवडला नाही.
Kunal Shah : मुंबईकर कुणाल शाह चर्चेत; FreeCharge ते CRED असा प्रेरणादायी प्रवास
मुंबई : विल्सन कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात पदवी घेतल्यानंतर मॅनेजमेंटचे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुंबईकर कुणाल शाह यांचं नाव आज देशातील सर्वात यशस्वी ...
यावर प्रतिक्रिया देताना रितेश म्हणाला की, या प्रश्नाला उत्तर देऊन त्याला महत्त्व द्यायचे नाही. त्यामुळे तो यावर काहीही बोलणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यानंतरही सलमान आणि संजय दत्त यांना शोमध्ये सहभागी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर रितेशने सांगितले की, शोमध्ये कोण सहभागी होणार याचा निर्णय तो घेत नाही. त्याची भूमिका केवळ होस्ट म्हणून असून स्पर्धकांची निवड निर्माते आणि शोची टीम करत असते.
Mumbai Rain: मुंबईत पावसाची दमदार हजेरी; ४८ तासांत मोठी अपडेट
Mumbai Rain : मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने आणि दमट हवामानाने हैराण ...
या कार्यक्रमात दिग्दर्शिका फराह खान आणि नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुख मोनिका शेरगिलही उपस्थित होत्या. मोनिकाने हलक्या-फुलक्या अंदाजात रितेश आणि फराह यांचे कौतुक करत दोघेही शोसाठी योग्य ‘जेलर’ असल्याचे सांगितले.
लवकरच शो सुरु होणार
‘लॉक अप: सच या सजा’ हा रिअॅलिटी शो २७ जून २०२६ पासून नेटफ्लिक्सवर सुरू होणार आहे. या शोमध्ये १४ सेलिब्रिटी स्पर्धक एका विशेष सेटवर एकत्र राहणार असून त्यांना विविध आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. शोमध्ये सत्य, कबुलीजबाब आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.