UK PM Keir Starmer Resigns : ब्रिटनच्या राजकारणात मोठा भूकंप! कीर स्टारमर यांचा राजीनामा; दशकात पद सोडणारे सहावे पंतप्रधान

लंडन : ब्रिटनच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून पंतप्रधान आणि लेबर पक्षाचे नेते कीर स्टारमर (Keir Starmer) यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. पक्षांतर्गत वाढता असंतोष, नेतृत्वावर उपस्थित होणारे प्रश्न आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे स्टारमर यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या राजीनाम्यामुळे ब्रिटिश राजकारणात नव्या नेतृत्वाच्या चर्चांना वेग आला आहे. (UK PM Keir Starmer Resigns)


राजीनाम्याची घोषणा करताना स्टारमर म्हणाले की, आगामी निवडणुकीत लेबर पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आपण योग्य व्यक्ती आहोत की नाही, याबाबत पक्षातील अनेक खासदार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये शंका निर्माण झाली होती. पक्षाकडून मिळालेला स्पष्ट संदेश स्वीकारत आपण पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. (UK PM Keir Starmer Resigns)



पक्षांतर्गत दबाव वाढला :


स्टारमर यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, संसदीय पक्षातील अनेक सदस्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली लेबर पक्षाला अपेक्षित यश मिळेल याबाबत विश्वास राहिला नव्हता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नव्या चेहऱ्याची गरज असल्याची भावना बळावत होती. त्यामुळे पक्षहिताला प्राधान्य देत त्यांनी पंतप्रधान आणि पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. "लोकशाही व्यवस्थेत पक्षाच्या मतांचा आदर करणे आवश्यक असते. पक्षातील सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना मी गांभीर्याने घेतल्या. आता नव्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली आहे," असे स्टारमर यांनी सांगितले. (UK PM Keir Starmer Resigns)



कार्यकाळाचा घेतला आढावा :


आपल्या कार्यकाळाचा आढावा घेताना स्टारमर यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख केला. लेबर पक्षातील ज्यूविरोधी विचारसरणीला आळा घालण्यासाठी आपण कठोर पावले उचलल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि ब्रिटनच्या जागतिक प्रतिमेला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. "दोन वर्षांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षण होता. देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे," असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले. (UK PM Keir Starmer Resigns)



दशकात पद सोडणारे सहावे पंतप्रधान :


स्टारमर यांच्या राजीनाम्यामुळे गेल्या दहा वर्षांत पद सोडणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानांची संख्या सहावर पोहोचली आहे. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता वाढल्याचे अनेकदा दिसून आले असून, विविध कारणांमुळे अनेक पंतप्रधानांना कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच पद सोडावे लागले आहे. (UK PM Keir Starmer Resigns)



पुढे काय?


स्टारमर यांच्या राजीनाम्यानंतर आता लेबर पक्षाच्या नव्या नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता पक्षासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या नेत्यासमोर पक्षातील एकजूट टिकवून ठेवण्याबरोबरच मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, स्टारमर यांच्या अचानक झालेल्या निर्गमनामुळे ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पुढील काही दिवस देशाच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत. (UK PM Keir Starmer Resigns)

Comments
Add Comment

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

Donald Trump : ट्रम्प प्रशासनाकडून इराणला मदत करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)