Dubai : कतारच्या गॅस टर्मिनलमध्ये भीषण स्फोट; ५४ जण जखमी, १८ बेपत्ता

कतार : कतारमधील (Qatar) रास लफान औद्योगिक क्षेत्रात रविवारी रात्री मोठा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत किमान ५४ जण जखमी झाले असून १८ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथके घटनास्थळी युद्धपातळीवर शोध आणि मदतकार्य करत आहेत. (Massive Explosion)


मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट कतारच्या प्रमुख नैसर्गिक वायू निर्यात टर्मिनल परिसरात झाला. अलीकडील प्रादेशिक तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे काही काळ बंद असलेले कामकाज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. (Qatar Gas Terminal Explosion)



स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी काही जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. मात्र काही तासांनंतर जखमींची संख्या ५४ वर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. अनेक कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध सुरू असून बेपत्ता व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कतार हा जगातील प्रमुख नैसर्गिक वायू उत्पादक देशांपैकी एक असल्याने या घटनेचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. रास लफान हे देशातील महत्त्वाचे ऊर्जा केंद्र मानले जाते आणि येथून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूची निर्यात केली जाते. (Qatar Fire Accident)


स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच स्फोटामुळे झालेल्या नुकसानाचे मूल्यांकनही सुरू करण्यात आले आहे.



या घटनेमुळे कतारमधील ऊर्जा क्षेत्रासमोर नवे आव्हान निर्माण झाले असून अधिकृत तपासानंतरच दुर्घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे.SEO Keywords:


Comments
Add Comment

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर

Kenya Helicopter Crash : केन्यामध्ये सफारीसाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 5 अमेरिकन पर्यटकांसह सर्व 7 जणांचा मृत्यू

नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल