Nashik Vidhan Parishad Election : विजय मिळताच गोकुळ गितेंना शिंदेंचा मेसेज ? मुंबईत आज मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (Nashik Vidhan Parishad Election) निवडणुकीत अपक्ष उमेदवार (Gokul Gite ) यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या विजयामुळे गिते हे या निवडणुकीतील ‘जायंट किलर’ ठरले असून, निकालानंतर आता राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.



गोकुळ गितेंना शिंदेंचा निरोप ?


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजयाची घोषणा होताच गोकुळ गिते यांच्याशी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तातडीने मुंबईत बोलावल्याचा निरोप सामंत यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



गिते शिंदे सेनेत प्रवेश करणार ?


मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ गिते हे सोमवारी दुपारच्या सुमारास विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, गिते आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गिते यांच्या विजयाने अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसत आहे. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या गिते यांनी थेट महायुतीच्या उमेदवारालाच धक्का दिल्याने हा निकाल राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. आता मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर गिते यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे नाशिकसह राज्याचे लक्ष लागून आहे.



१०९ मतांच्या फरकाने गितेंचा दणदणीत विजय


नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण ६१९ मतदार पात्र होते. त्यापैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीदरम्यान १३ मते अवैध ठरल्याने विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.


मतमोजणीत गोकुळ गिते यांना तब्बल ३५७ मते मिळाली, तर नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गिते यांनी पहिल्याच फेरीत १०९ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत विधान परिषदेचे सदस्यपद पटकावले. हा विजय केवळ गिते यांच्यासाठीच नव्हे, तर नाशिकच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती