Tamil Nadu : तामीळनाडूत सीफूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया गळती, अनेकांचा मृत्यू

चेन्नई : तामीळनाडूत सीफूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया गळती झाली. ही घटना तामीळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात घडली. अमोनिया गळतीमुळे सीफूड प्रोसेसिंग युनिटमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आणि ७० जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.



हाती आलेल्या माहितीनुसार, तामीळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या पेरियपालयम जवळ कनिगईपैरमध्ये 'सेंट पीटर्स पॉल सीफूड एक्सपोर्ट्स'च्या प्रकल्पात अमोनिया गळती झाली. अमोनिया गळती झल्याचे लक्षात येताच प्रकल्प व्यवस्थापनाने अरक्कोणम येथील एनडीआरएफच्या टीमशी तातडीने संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अरक्कोणम येथील एनडीआरएफची एक टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. एनडीआरएफच्या सदस्यांनी त्यांच्या मुख्यालयाशी संपर्क साधून चौथ्या क्रमांकाची बटालियन घटनास्थळी तातडीने पोहोचेल अशी व्यवस्था केली. घटनास्थळी एनडीआरएफच्या मार्गदर्शनात मदतकार्य सुरू आहे.







मुख्यमंत्री सी. जोसेफ यांनी अमोनिया गळती प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ विभागाचे संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सरचिटणीस आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक या तीन जणांची समिती चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. समिती पुढील २४ तासांत पहिला अहवाल देईल आणि नंतरच्या तीन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करणार आहे.माहिती तंत्रज्ञान मंत्री हे तिरुवल्लूर जिल्ह्यातले आहेत त्यामुळे त्यांना आणि प्रशासकीय अधिकारी के.पी. कार्तिकेयन यांना घटनास्थळाचा दौरा करून अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पीडितांना सरकारी नियमानुसार योग्य ती भरपाई देण्याची घोषणाही मुख्यमंत्री सी. जोसेफ यांनी केली आहे. जखमींना उपचारांसाठी आवश्यक ती मदत पुरविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सी. जोसेफ यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

PM Modi : दिल्ली विमानतळावर नरेंद्र मोदी ४५ मिनिटे थांबेल ! काय झालं असेल ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित

Partner Swapping Gujarat : सौदे में पत्नी! सूरतमध्ये उघड झाला 'बायकांच्या अदलाबदलीचा' काळा धंदा

गुजरात: गुजरातमध्ये (Gujrat) कथित पार्टनर स्वॅपिंग प्रकरणाची चर्चा रंगली असून, सुरतमधील एका महिलेने केलेल्या गंभीर

International Yoga Day : अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी योग दिनी शेअर केले खास सीक्रेट

International Yoga Day :मुंबई : १२व्या आंतरराष्ट्रीय योग (International Yoga Day) दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते अनेक

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनी राज्यपालांचा योगाभ्यास; प्रशिक्षित योग शिक्षक घडवण्याचे आवाहन

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शनिवारी महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये तणाव, पण भारत निर्धास्त! लाखो टन कच्चे तेल घेऊन ३ जहाजे भारताकडे रवाना

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील (Strait of Hormuz) अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर

International Yoga Day 2026 PM Modi : "योग मानवतेला एकत्र आणणारी शक्ती"; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश

कोलकाता : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त कोलकाता येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी