चेन्नई : तामीळनाडूत सीफूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया गळती झाली. ही घटना तामीळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात घडली. अमोनिया गळतीमुळे सीफूड प्रोसेसिंग युनिटमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आणि ७० जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.
पंजाब : पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला (शुभदीप सिंग सिद्धू) याने आपल्या कलेने अनेकांच्या हृदयात घर केले होते. मानसा येथील जवाहरके गावात २९ मे २०२२ रोजी ...
हाती आलेल्या माहितीनुसार, तामीळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या पेरियपालयम जवळ कनिगईपैरमध्ये 'सेंट पीटर्स पॉल सीफूड एक्सपोर्ट्स'च्या प्रकल्पात अमोनिया गळती झाली. अमोनिया गळती झल्याचे लक्षात येताच प्रकल्प व्यवस्थापनाने अरक्कोणम येथील एनडीआरएफच्या टीमशी तातडीने संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अरक्कोणम येथील एनडीआरएफची एक टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. एनडीआरएफच्या सदस्यांनी त्यांच्या मुख्यालयाशी संपर्क साधून चौथ्या क्रमांकाची बटालियन घटनास्थळी तातडीने पोहोचेल अशी व्यवस्था केली. घटनास्थळी एनडीआरएफच्या मार्गदर्शनात मदतकार्य सुरू आहे.
View this post on Instagram
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Shri Vitthal-Rukmini Temple) परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या’ला प्रशासकीय ...
मुख्यमंत्री सी. जोसेफ यांनी अमोनिया गळती प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ विभागाचे संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सरचिटणीस आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक या तीन जणांची समिती चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. समिती पुढील २४ तासांत पहिला अहवाल देईल आणि नंतरच्या तीन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करणार आहे.माहिती तंत्रज्ञान मंत्री हे तिरुवल्लूर जिल्ह्यातले आहेत त्यामुळे त्यांना आणि प्रशासकीय अधिकारी के.पी. कार्तिकेयन यांना घटनास्थळाचा दौरा करून अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पीडितांना सरकारी नियमानुसार योग्य ती भरपाई देण्याची घोषणाही मुख्यमंत्री सी. जोसेफ यांनी केली आहे. जखमींना उपचारांसाठी आवश्यक ती मदत पुरविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सी. जोसेफ यांनी दिले आहे.






