Monsoon Delay : जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

अलिबाग : जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील घट लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव (स्विमिंग पूल) दि. 20 जून ते 30 जून 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.



आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या दि. 20 जून 2026 च्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे अद्याप मान्सून जिल्ह्यात पूर्णपणे दाखल झालेला नसून उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 28 लघुप्रकल्पांमध्ये सरासरी केवळ 17.89 टक्के तर हेटवणे मध्यम प्रकल्पामध्ये 27.31 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच महावेध पोर्टलवरील अहवालानुसार दि. 20 जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ 8.9 मि.मी. म्हणजेच सुमारे 2 टक्के पावसाची नोंद झाली आहे.



पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी स्विमिंग पूल बंद ठेवणे, पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि अनधिकृत पाणीवापर थांबविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. सर्व तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतांचे मुख्याधिकारी, पनवेल महानगरपालिका, ग्रामपंचायती, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, हेटवणे मध्यम प्रकल्प विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व जलतरण तलाव तात्काळ बंद राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाणीपुरवठ्यातील कपातीबाबत नागरिकांना पूर्वसूचना देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास

Buldhana Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकची समोरील वाहनाला धडक; चालकाचा जागीच मृत्यू, क्लिनर जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरुच असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास आणखी एक भीषण अपघाताची