Parabharani : मंदिराचे सभामंडप कोसळले आणि होत्याचे नव्हते झाले... धक्कादायक घटनेचे इत्यंभूत वृत्त

परभरणी : मानवत तालुक्यातील यशवाडी परिसरात हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे छत कोसळून मोठी दुर्घटना झाली. सभामंडपाचे छत कोसळल्यामुळे चार भाविकांचा मृत्यू झाला. छताखाली दबल्यामुळे जखमी झालेल्या ३१ जणांवर उपचार सुरू आहेत.


हनुमान मंदिरात शनिवार २० जून रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू असताना मंदिराच्या सभामंडपाचे छत कोसळले. अनेक भाविक छताखाली दबले.



घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली. बचावकार्य सुरू करण्यात आले.ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी रुग्णवाहिका तसेच निवडक खासगी वाहनांची मदत घेण्यात आली. दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मंडपाच्या संरचनेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.






कीर्तनासाठी जमली होती हजारोंची गर्दी


मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील तसेच बाहेरील गावांमधून मोठ्या संख्येने भाविक कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. मंडपात मोठी गर्दी असताच मंडपाचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली . अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


तात्काळ बचाव आणि मदत


दुर्घटनेनंतर तातडीने आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना घटनास्थळावर प्राथमिक उपचार देऊन आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. पोलीस, महसूल प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवक बचावकार्यात सहभागी झाले असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का याची तपासणी सुरू आहे. मृत आणि जखमींची अधिकृत यादी प्रशासनाकडून जाहीर करण्याचे काम सुरू आहे.


 




मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख


परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माणकार्य सुरू असलेल्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी असून मदत आणि बचावकार्य सुद्धा वेगाने सुरु आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी 'जेन-झी' इन्फ्लुएंसर्सना २५ हजारांची ऑफर?

- भाजपकडून व्हिडिओ पुरावा सादर; काँग्रेसचा 'फर्जीवाडा' उघड झाल्याचा दावा मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल