Shrigonda Police Bribery Case : रक्षकच झाले भक्षक ! गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी घेतली ७ हजारांची लाच

Shrigonda Police Bribery Case : पोलिसांना रक्षक समजले जाते, पण हेच पोलीस भक्षक झाले तर सर्वसामान्यांनी जायचं कोणाकडे असा प्रश्न श्रीगोंदाकडे घडलेल्या एका घटनेनं उपस्थित होत आहे.



नेमकं काय घडलं ?


श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील (Srigonda Police Station) तीन कर्मचार्‍यांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि त्याची माहिती ॲप्लिकेशनमध्ये भरण्यासाठी तक्रारदारांकडून १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती, दरम्यान, तडजोडीअंती सात हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील तीन कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



या पोलिसांवर गुन्हा दाखल


या गंभीर प्रकरणात पोलिस अंमलदार नितीन अशोक गाडगे (वय 44), राजेश रावसाहेब जाधव (वय 38), दादाराम शिवराम म्हस्के (वय 56) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, दशरथ लाड यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.



नेमकं प्रकरण काय ?


तक्रारदाराच्या भावाचा १ जून रोजी अपघात झाला होता. त्यांच्यावर दौंड (Daund) येथील पाटील हॉस्पिटलमध्ये (Patil Hospital) उपचार सुरू होते. याप्रकरणी दौंड पोलिसांनी तक्रारदाराच्या भावाचा जबाब नोंदवून हे प्रकरण श्रीगोंदा पोलिस ठाण्याकडे वर्ग केले होते. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक नितीन गाडगे यांच्याकडे होता. अपघाताच्या ठिकाणाची माहिती आयआरएडी ॲप्लिकेशनमध्ये भरण्यासाठी आणि रीतसर गुन्हा दाखल करण्यासाठी नितीन गाडगे व मदतनीस राजेश जाधव यांनी तक्रारदाराकडे १० हजारांच्या लाचेची मागणी केली.


तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार १६ ते १८ जून दरम्यान लाचलुचपत पथकाने पडताळणी सापळा लावला असता नितीन गाडगे व राजेश जाधव यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती सात हजार देण्याचे ठरले. या दरम्यान शासकीय वाहनावरील चालक दादाराम म्हस्के याने मध्यस्थी करीत नितीन गाडगे यांनी मागितलेली सात हजारांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. १८ जून रोजी म्हस्के याला सात हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

Comments
Add Comment

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत

Weight Loss Tips : व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय? मग आहारात ‘या’ पदार्थांचा नक्की करा समावेश

मुंबई : वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांना नियमित