Pavanraje Nimbalkar Murder Case : आरोपींची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलांसह सर्व आरोपी निर्दोष

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या आणि तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना पुराव्याअभावी आणि संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने या प्रकरणातील तपासातील गंभीर त्रुटींवर भाष्य करत सीबीआय आणि पोलिसांच्या तपास पद्धतीवरही कठोर निरीक्षणे नोंदवली. (Pavanraje Nimbalkar Murder Case)



माफीच्या साक्षीदाराची साक्ष ठरली अविश्वसनीय :


सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी निकाल देताना स्पष्ट केले की,

">संपूर्ण खटला माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांच्या साक्षीवर आधारित होता. मात्र त्यांच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती, विरोधाभास आणि संशयास्पद बाबी आढळून आल्याने ती साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही. न्यायालयाने नमूद केले की, जैन यांना अधिकृत अटकेपूर्वी अनेक दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आल्याचे आरोप आहेत. त्यांच्या कबुलीजबाबाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून तपास यंत्रणांनी ही बाब न्यायालयापासून लपविल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. (Pavanraje Nimbalkar Murder Case)



‘२० वर्षांनी निकाल देणे दुर्दैवी’ :


निकाल वाचताना न्यायमूर्ती नावंदर म्हणाले की, "एका लोकनेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या होते आणि त्या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी २० वर्षे लागतात, ही न्यायव्यवस्थेसाठी दुर्दैवी बाब आहे." या प्रकरणात तब्बल १२७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सुरुवातीला कळंबोली पोलिसांकडे असलेला तपास नंतर नवी मुंबई गुन्हे शाखेकडे आणि त्यानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. (Pavanraje Nimbalkar Murder Case)



मोबाईल, कॉल रेकॉर्ड आणि पुराव्यांचा अभाव :


न्यायालयाने तपासातील अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले नव्हते, तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) गोळा करण्यात आले नव्हते. त्यामुळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का, याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणांना सादर करता आला नाही. तसेच घटनाक्रमाशी संबंधित अनेक दावे आणि पुराव्यांमध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (Pavanraje Nimbalkar Murder Case)



साक्षीदाराच्या ‘चार वेगवेगळ्या कथा’ :


माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांनी हत्येच्या रात्री आपण कुठे होतो याबाबत वेगवेगळ्या टप्प्यांवर चार भिन्न कहाण्या सांगितल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणले. प्रत्येक वेळी वेगळी माहिती दिल्यामुळे त्यांच्या साक्षीची विश्वासार्हता पूर्णपणे कमी झाल्याचे न्यायालयाने म्हटले. (Pavanraje Nimbalkar Murder Case)



गाडीच्या रंगापासून घटनास्थळापर्यंत गोंधळ :


गुन्ह्यात वापरल्याचा आरोप असलेली गाडी जळालेली असतानाही जप्ती पंचनाम्यात तिचा रंग नमूद करण्यात आला होता. तसेच गाडी नेमकी कुठे सापडली याबाबतही साक्षीदार आणि पोलिसांच्या नोंदींमध्ये तफावत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (Pavanraje Nimbalkar Murder Case)



राजकीय वैमनस्य मान्य, पण पुरावे अपुरे :


न्यायालयाने मान्य केले की, पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आणि मतभेद होते. तेरणा साखर कारखाना आणि निवडणुकीतील घडामोडींमुळे दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. मात्र केवळ राजकीय वैमनस्याच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही. त्यासाठी ठोस आणि निर्विवाद पुरावे आवश्यक असतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (Pavanraje Nimbalkar Murder Case)



निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का :


या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. दुसरीकडे, तब्बल २० वर्षांपासून सुरू असलेल्या या बहुचर्चित खटल्याचा शेवट सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्ततेने झाला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पवनराजे हत्याकांडाची चर्चा रंगली असून, तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Pavanraje Nimbalkar Murder Case)



पवनराजे हत्याकांड प्रकरण : नेमकी घटना काय ?


३ जून २००६ ही तारीख होती, मुंबईत काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हे आले होते. त्यांचं काम संपल्यानंतर ते पुण्याच्या दिशेने निघाले होते. पवनराजे निंबाळकर जेव्हा कळंबोली या ठिकाणी पोहचले तेव्हा त्यांना तिथे एका व्यक्तीला बार्शी येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत चर्चा करायची होती. पवनराजे पांढऱ्या कारने कळंबोलीतील चार रस्ता भागात पोहचले, तिथे पवनराजेंवर हल्ला करण्यासाठी मारेकरी आधीपासूनच पाळत ठेवून होते असं सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. मारेकऱ्यांनी त्यांच्या कारला ओव्हरेटक केलं. चालकाला कार थांबव असं सांगितलं. पवनराजेंना कारमध्ये झोप लागली होती. मारेकरी कारजवळ आले आणि चौकशी करण्याच्या निमित्ताने बोलू लागले. तेव्हा कार चालकाने त्यांना उठवलं आणि खिडकीच्या काचा खाली केल्या. ज्यानंतर या शूटर्सनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. पवनराजे यांना जखमा झाल्या, त्यांचा कार चालक समद काझीही जखमी झाला.

">सीबीआयने दिलेल्या आरोपपत्रानुसार मारेकरी कारने पळून गेले. काही अंतरावरुन त्यांनी बंदूक आणि इतर हत्यारं फेकून दिली. पनवेल येथील बेलवली या गावात मारेकऱ्यांनी इंडिका सोडून दिली. (Pavanraje Nimbalkar Murder Case)




Comments
Add Comment

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा कहर! अमरावती-यवतमाळला रेड अलर्ट; 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पुढील 24 तास महत्त्वाचे; काही भागांत 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई:

Chandrashekhar Bawankule : ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक

- निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : आई-वडील आणि ज्येष्ठ

Pune Murder : शिक्रापुरात पोत्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटकडून खून

धक्कादायक! पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला; दोन्ही आरोपींना अटक पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील

Ahilyanagar : 'ॲट्रॉसिटी’चे खटले चालवण्यासाठी अहिल्यानगरला विशेष न्यायालय मंजूर

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानूसार (Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act) दाखल

IMD Monsoon update : पुढील ४८ तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाकडून धुवांधार पावसाचा इशारा; पाहा तुमचा जिल्हा आहे का ?

मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा अत्यंत रौद्र रूप धारण केले असून आगामी दोन दिवस विविध भागांत मुसळधार ते

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; ट्रॅफिकच्या जाचातून मिळणार दिलासा

माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम या १३ किमी टप्प्याला सुरक्षा मंजुरी; पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांवरून मेट्रो