Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMCची तब्बल १,३०० कोटींहून अधिक रकमेची तीन बँक खाती गोठवली

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर अंतर्गत संघर्षाने ग्रासलेल्या तृणमूल काँग्रेसला (TMC) मोठा धक्का बसला असून पक्षाची एचडीएफसी बँकेतील तीन महत्त्वाची खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमधून कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास सध्या बंदी घालण्यात आली असून प्रत्येक खात्यात तब्बल ४४० कोटी रुपये जमा असल्याचे समोर आले आहे. (Mamata Banerjee)



माजी खजिनदारांच्या पत्रानंतर कारवाई :


पक्षाचे माजी खजिनदार अरूप बिस्वास यांनी एचडीएफसी बँकेला पत्र लिहून पक्षाची खाती गोठवण्याची मागणी केली होती. पक्षाचे खरे नेतृत्व कोणाकडे आहे, याबाबत गंभीर वाद सुरू असल्याने निधीच्या सुरक्षेसाठी तातडीची पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला अरूप बिस्वास यांना खजिनदारपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी केलेल्या या हालचालीमुळे पक्षातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे मानले जात आहे. (Mamata Banerjee)



२० खासदारांचे बंड, पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह :


या घडामोडी अशा वेळी समोर आल्या आहेत, जेव्हा टीएमसीचे २० लोकसभा खासदार सभापती ओम बिरला यांची भेट घेऊन नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याची घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे. बंडखोर गटाने आपणच खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा करत पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि मालमत्तेवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे पक्षातील सत्तासंघर्ष आता थेट आर्थिक मालमत्ता आणि निधीच्या नियंत्रणापर्यंत पोहोचला आहे. (Mamata Banerjee)



TMC कडे किती संपत्ती?


निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालानुसार, तृणमूल काँग्रेसची एकूण मालमत्ता १,०८१.७८ कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये ६२५.७८ कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये, २५०.७७ कोटी रुपये गुंतवणुकीत तर ५० कोटी रुपये धनादेशांच्या स्वरूपात असल्याची नोंद आहे. (Mamata Banerjee)



निधीच्या सुरक्षेसाठी 'जैसे थे' स्थितीची मागणी :


अरूप बिस्वास यांनी बँकेला पाठवलेल्या पत्रात खात्यांमधील निधी सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही डेबिट व्यवहार, निधी हस्तांतरण किंवा खात्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्यास मनाई करण्याची मागणी केली होती. पक्षाच्या नेतृत्वावरून निर्माण झालेला वाद निकाली निघेपर्यंत निधीचा गैरवापर होऊ नये, तसेच अनधिकृत व्यक्तींना आर्थिक व्यवहार करता येऊ नयेत, यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Mamata Banerjee)



मालमत्तेच्या नियंत्रणावरून संघर्ष तीव्र :


बिस्वास यांनी दावा केला की, पक्षाचे कामकाज, आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेच्या नियंत्रणावरून गंभीर मतभेद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत पक्षाचा निधी केवळ कायदेशीर आणि अधिकृत नेतृत्वाकडेच राहणे आवश्यक आहे. (Mamata Banerjee)


या सर्व घडामोडींमुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससमोर केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक आणि संघटनात्मक संकटही उभे ठाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Mamata Banerjee)

Comments
Add Comment

Free Online Coaching for Competitive Exams : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याच्या

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा

BMC Pedestrian First Initiative : दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी केली पाहणी

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका मुबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी