Crime News : भिशीच्या पैशांवरून वाद; तरुणाची आत्महत्या, मृत्यूपूर्वीच्या व्हिडीओने खळबळ

Ahilyanagar Crime News :हिल्यानगर मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भिशीचे लाखो रुपये अडकून आर्थिक संकटात सापडलेल्या विष निवडुंगे येथील एका ३५ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळासाहेब कुंडलिक ढवळे असे मृत तरुणाचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्यांनी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये तिघांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब ढवळे यांनी मंगळवारी सायंकाळी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने शेवगाव (Shevgaon) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने बुधवारी त्यांना पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे हलविण्यात येत होते. दरम्यान, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.


आत्महत्येपूर्वी ढवळे यांनी एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी तिघांची नावे घेत भिशीचे लाखो रुपये परत न मिळाल्यामुळे आपण गंभीर आर्थिक अडचणीत सापडलो असल्याचा दावा केला आहे. याच आर्थिक तणावामुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कामात सक्रिय झाल्यानंतर काहींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी व्हिडीओत केला आहे.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, व्हिडीओमधील आरोपांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे. पाथर्डी पोलीस संबंधित व्यक्तींचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.



हिंदुत्ववादी संघटना आक्रमक


घटनेनंतर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरपंच संजय मरकड, किरण अकोलकर आणि बाळासाहेब गीते यांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


मृत बाळासाहेब ढवळे यांचे भाऊ महेश ढवळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे निवडुंगे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती