Murlidhar Mohol Father passes away : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; आज पुण्यात अंत्यसंस्कार

पुणे: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या  ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच पुणे शहरासह विविध क्षेत्रांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



किसनराव मोहोळ हे सामाजिक, क्रीडा आणि सहकार क्षेत्राशी जवळून जोडलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर विविध क्षेत्रांत काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कुस्ती या पारंपरिक खेळाची त्यांना विशेष आवड होती. पैलवान म्हणून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. क्रीडाप्रेमी म्हणूनही त्यांचा परिसरात मोठा सन्मान होता.


व्यावसायिक आयुष्यात त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जवळपास ४० वर्षे सेवा बजावली. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे अनेक सहकाऱ्यांमध्ये त्यांचा आदर होता. साधी राहणी, लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि समाजकार्यातील सहभाग यामुळे ते अनेकांच्या परिचयाचे होते. (Murlidhar Mohol Father passes away)



किसनराव मोहोळ यांच्या निधनामुळे मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. किसनराव मोहोळ यांच्या निधनामुळे सहकार, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०