Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेची पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा येथील १.१६ हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या (शासकीय निवास व्यवस्था) उभारणीसाठी मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. गारखेडा येथील सर्व्हे क्रमांक १५३०९ मधील ही जमीन औद्योगिक व कामगार न्यायालय, छत्रपती संभाजीनगर यांना भोगवटादार वर्ग-२ या अटीवर महसूलमुक्त पद्धतीने देण्यात येणार आहे. या जागेवर न्यायालयीन इमारत आणि न्यायिक अधिकाऱ्यांसाठी आवश्यक निवासस्थाने उभारण्यात येतील. सध्या न्यायालयीन यंत्रणेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता स्वतंत्र आणि सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता होती. या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत मिळणार आहे. तसेच न्यायिक अधिकाऱ्यांना आवश्यक निवास सुविधा उपलब्ध झाल्याने न्यायव्यवस्थेच्या कामकाजाला अधिक बळ मिळणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०