Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया


मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच, सत्ताधारी शिवसेनेतर्फे यावर पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन टायगर' मोहिमेवर त्यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. "दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल", असे सूचक विधान त्यांनी केले आहे.


या बंडखोर खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा नेमका कधी आणि कुठे होणार, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असतानाच, शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे येत्या ४८ तासांत राज्याच्या राजकारणात आणखी काहीतरी मोठी घडामोड घडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.खासदार फुटीनंतर उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्ष सोडणाऱ्यांना भरचौकात 'तुडवा' असे विधान केले आहे. त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, "जे लोक जास्त ओरडतात, ते प्रत्यक्षात काहीही करू शकत नाहीत. 'जो गरजते है, वो बरसते नही', ही त्यांची अवस्था आहे," अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्या इशाऱ्याची हवा काढून घेतली.



विरोधक जेवढे आरोप करतील, तितका आमचाच फायदा!


या बंडखोरीच्या मागे सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची मोठी आर्थिक रसद पुरवल्याचा गंभीर आरोप उबाठा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. या आरोपांवर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, "विरोधी पक्षातील नेत्यांना आता आरोप करण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. ते आमच्यावर जेवढे जास्त आरोप करतील, ते जेवढे जास्त बेताल बोलतील, तितका राजकीयदृष्ट्या आमचा आणि आमच्या शिवसेनेचाच फायदा होणार आहे."

Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले