Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव आसिम कुमार गुप्ता, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, कृती समितीचे प्रतिनिधी सचिन अहिरे, गजानन नांगे, नितीन नांदगावकर आदी उपस्थित होते.



यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.कामगारांच्या हिताबरोबरच मुंबईकरांचे हितही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.



मंत्री सरनाईक म्हणाले की,
येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये या प्रश्न संदर्भात बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तत्पूर्वी स्थानिक प्रश्नासंदर्भात महाव्यवस्थापक स्तरावर ज्या मागण्या पूर्ण करणे शक्य आहे, त्या या आठवड्याभरात पूर्ण कराव्यात असे निर्देश मी संबंधितांना दिले आहेत.



"बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. दररोज सुमारे ३० लाख प्रवासी बेस्ट सेवेवर अवलंबून आहेत. तसेच ४८ हजारांहून अधिक कामगार या संस्थेशी जोडलेले आहेत. त्यामुळे संपामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे मोठे हाल होऊ शकतात. चर्चा सकारात्मक वातावरणात सुरू असून, कर्मचाऱ्यांनी जनहिताचा विचार करून संप मागे घ्यावा," असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.


सरकार आणि बेस्ट प्रशासन कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असून, संवादाच्या माध्यमातून सर्व प्रश्न निकाली निघतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले