Dharmarao Baba Atram : 'तुतारी'चे ५ खासदार 'घड्याळा'ची साथ देणार?

माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम; १२ डिसेंबरआधी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार


मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उबाठा पक्षाला खिंडार पाडत 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) यशस्वी केल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात आणखी एका भूकंपाचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटाबाबत खळबळजनक दावा केला आहे. "आम्हाला कोणतेही ऑपरेशन राबवण्याची गरज नाही, पण शरद पवार गटाचे (तुतारी) कमीत कमी ५ विद्यमान खासदार निधी आणि विकासकामांसाठी स्वतःहून घड्याळाची साथ देण्यास इच्छुक आहेत," असे वक्तव्य आत्राम यांनी केले आहे.



"आम्ही 'ऑपरेशन घड्याळ' वगैरे काहीही करणार नाही. पण प्रत्येक खासदाराला त्याच्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांचे ऑपरेशन तुतारीवाले स्वतःच करतील. माझा अंदाज आहे की, तुतारीचे ५ खासदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात. मला वाटते की १२ डिसेंबरपर्यंत हे खासदार आमच्याकडे अधिकृतपणे आलेले दिसतील," असा दावा आत्राम यांनी केला.


काँग्रेसचेही काही खासदार संपर्कात


आत्राम म्हणाले, "उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खंबीर नेतृत्वावर लोकांचा आणि लोकप्रतिनिधींचा विश्वास आणखी वाढला आहे. काही माजी खासदारांसह विद्यमान खासदारही आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. केवळ तुतारीच नव्हे, तर काँग्रेसचेही काही खासदार आमच्या संपर्कात असून ते पक्षात येण्यास इच्छुक आहेत. सर्वांना आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर निधी आणि विकासकामे हवी आहेत. आपण निवडून आलो आहोत तर लोकांची कामे झाली पाहिजेत, याच अपेक्षेने हे लोक आमच्याकडे येतील", असे आत्राम यांनी नमूद केले.


धैर्यशील मोहिते पाटलांनी दावा फेटाळला


धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या या दाव्यावर शरद पवार गटाकडून तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही, आमची फळी पूर्णपणे मजबूत आहे. मात्र, इतर दुसऱ्या पक्षांबाबत काय सुरू आहे, यावर मी काहीही बोलणार नाही."
Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान