Etha Teaser : 'ईठा'मध्ये श्रद्धा कपूरची दमदार एन्ट्री; टीझर पाहून चाहत्यांच्या अंगावर काटा

श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) आगामी 'ईठा' (Etha) चित्रपट (Movie) सध्या चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर (Teaser) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून त्यामध्ये श्रद्धाचा नवा आणि दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठ्ठाबाई नारायणगावकर (Vitthabai Narayangaonkar) यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात श्रद्धा मुख्य भूमिका साकारत आहे. (Bollywood News)


दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात विठ्ठाबाई यांच्या आयुष्यातील संघर्ष, यश आणि कला क्षेत्रातील प्रवास दाखवण्यात येणार आहे. १९४० ते १९९० या काळातील त्यांचे जीवनपट या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.



टीझरमध्ये श्रद्धा कपूर लावणी कलाकाराच्या भूमिकेत दिसत असून तिचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. टीझरमधील एका महत्त्वाच्या प्रसंगात विठ्ठाबाई रंगमंचावर कार्यक्रम सादर करत असताना त्यांना प्रसूती वेदना सुरू होतात. मात्र कार्यक्रम अर्धवट न सोडता त्या धैर्याने परिस्थितीचा सामना करतात आणि पुन्हा रंगमंचावर परततात. हा प्रसंग टीझरमधील सर्वात प्रभावी भाग ठरत आहे.


टीझरची झलक सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी श्रद्धा कपूरच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी तिच्या कारकिर्दीतील हा सर्वात वेगळा आणि आव्हानात्मक रोल असल्याचे म्हटले आहे. श्रद्धाचा पारंपरिक मराठमोळा अंदाज आणि लावणी सादरीकरणाची शैली प्रेक्षकांना विशेष आवडल्याचे दिसून येत आहे.


 

या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुडा आणि मोहम्मद झीशान अय्युब हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथा असलेला 'इथा' हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






मराठी संस्कृती आणि लावणी परंपरेचा गौरव करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

Comments
Add Comment

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी