Ashwini Bhide : भांडुप  जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत अतिउच्चदाब विद्युत मनोरे  स्थलांतरित 

 महानगरपालिकेची सुमारे ७ कोटी ४८ लाख रूपयांची बचत*


महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या कडून पाणीपुरवठा प्रकल्प विभागातील अभियंत्यांचा गौरव



मुंबई  :  मुंबई महानगरपालिकेतर्फे भांडुप संकुल येथे २००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्प अंतर्गत अतिउच्चदाब विद्युत मनोरे स्थलांतरित करण्याच्या कामात पाणीपुरवठा प्रकल्प विभागातील अभियंत्यांनी महानगरपालिकेची सुमारे ७ कोटी ४८ लाख रूपयांची आर्थिक बचत केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महानगरपालिका आयुक्त  आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी  शुक्रवारी १९ जून २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात संबंधित अभियंत्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले.

amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Pratap Sarnaik : मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

१ जून ते १५ ऑगस्टदरम्यान चार तासांचे मोफत प्रशिक्षण अनिवार्य मुंबई : राज्यातील, विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अमराठी रिक्षा (Non-MARATHI )आणि ...



कार्यकारी अभियंता  राजेश कापडणीस, सहायक अभियंता ऋषिकेश वर्तक ,  दुय्यम अभियंता  गुरुराज ऐवळे, दुय्यम अभियंता सुबोध नाखरेकर यांचा त्यात समावेश आहे. उपायुक्त  (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प)  चंद्रकांत चौधरी यावेळी उपस्थित होते. भांडुप संकुल येथील २००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या जलशुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प कमीत कमी जागेत (Minimum Footprintj) आणि शून्य सांडपाणी विसर्ग (Zero Waste Water Discharge) या संकल्पनेनुसार विकसित करण्यात येत आहे. प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेतून मेसर्स टाटा पॉवर कंपनी लिमिटेड यांच्या अतिउच्चदाब (Extra High Voltage - EHV) विद्युत पारेषण वाहिन्या जात असल्यामुळे या मनोऱ्यांचे स्थलांतरण करणे आवश्यक होते. त्यानुसार, महानगरपालिकेने टाटा पॉवर कंपनीकडून या वीज प्रसारण वाहिन्यांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली.




टाटा पॉवर कंपनीने या कामासाठी वस्तू् व  सेवा करासह १४ कोटी ७० लाख रूपये इतका अंदाजित खर्च सादर केला. करारातील तरतुदीनुसार, प्रकल्पाचे कंत्राटदार  वेलस्पन एंटरप्रायझेस लिमिटेड यांना आवश्यक आगाऊ रक्कम अदा केली. स्थलांतर योजनेनुसार, विद्यमान ३ अतिउच्चदाब मनोऱ्यांच्या स्थलांतरणासाठी सुमारे ५०० मीटर लांबीच्या परिसरात ५ नवीन मनोरे उभारण्यात आले. विद्युत पारेषण वाहिन्यांचे स्थलांतरणाचे काम फेब्रुवारी २०२६ मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाले. जुन्या ३ मनोऱ्यांपैकी २ मनोरे पूर्णपणे हटविण्यात आले आहेत.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Pratap Sarnaik : मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

१ जून ते १५ ऑगस्टदरम्यान चार तासांचे मोफत प्रशिक्षण अनिवार्य मुंबई : राज्यातील, विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अमराठी रिक्षा (Non-MARATHI )आणि ...




अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या  मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा प्रकल्प विभागातील अभियंत्यांना या कामाच्या अंमलबजावणी दरम्यान टाटा पॉवर कंपनीने सादर केलेला अंदाजित खर्च तुलनेने अधिक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, पाणीपुरवठा प्रकल्प विभागातील अभियंत्यांनी अतिउच्चदाब मनोऱ्यांच्या स्थलांतरणासाठी प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या आधाराद्वारे खर्चाचे पुनर्मूल्यांकन केले. लागू सवलती (Rebate) आणि हटविण्यात आलेल्या मनोऱ्यांच्या भंगार मूल्याची (Salvage Value) परतफेड करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर टाटा पॉवर कंपनीने प्रत्यक्ष खर्चाचे आर्थिक विवरण सादर करून ५ कोटी ७६ लाख रूपये इतकी रक्कम बृहन्मुंबई महानगरपालिकेला परत करण्यास मान्यता दिली आहे. याखेरीज, हटविण्यात आलेल्या मनोऱ्यांच्या भंगार मूल्याची रक्कमही महानगरपालिकेला प्राप्त होणार आहे.एकूणच, अतिउच्चदाब मनोऱ्यांच्या स्थलांतरणाच्या कामाचा प्रत्यक्ष खर्च ६ कोटी ६९ लाख रूपये इतका आहे. प्रारंभी अदा करण्यात आलेल्या १२ कोटी ४६ लाख रूपयांच्या् तुलनेत ५ कोटी ७६ लाख रूपयांची थेट बचत झाली आहे. याशिवाय, करारातील तरतुदीनुसार कंत्राटदाराचे १० टक्के ओव्हरहेड्स व नफा तसेच वस्तू व सेवा कराच्या रकमेची बचत झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सुमारे ७ कोटी ४८ लाख रूपयांची आर्थिक बचत झाली आहे. तसेच, हटविण्यात आलेल्या मनोऱ्यांच्या भंगार मूल्याच्या स्वरूपात आणखी आर्थिक बचत होणे अपेक्षित आहे.
Tags
infrastructureMumbai Water SupplyMumbai NewsTata PowerbmcAshwini BhideBrihanmumbai Municipal CorporationBhandup Water Treatment Plant

Comments
Add Comment

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध