Rohini Paradhye Case : रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात एक वेगळे वळण ;पतीवर मोठा आरोप
June 19, 2026 04:34 PM
क्राइम पंढरपूर
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण तथा रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आपल्याच हॉटेल मध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. वयाच्या अवघ्या २५ वर्षी तिने हे टोकाचं पाऊल उचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नक्की प्रकरण काय ?
रोहीनेनी ५ वर्षेपूर्वी नवरा निलेश विलास पाराध्ये याच्याशी प्रेमविवाह केला. रोहिणी हि रील स्टार(reel star) होती तर तिचा नवरा हा हॉटेल ग्रामपंचायतचा मालक होता. मात्र लग्नाच्या पाच वर्षा नंतर रोहिणीने आपल्याच्या हॉटेलच्या स्वयंपाकगृहात टोकाचं पाऊल उचलून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. तिने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं असं तिच्या वडिलांनी सांगितलं.
वडिलांनी सांगितलं...
रोहिणीच्या नवरा म्हणजेच निलेश हा तिला घरगुती कारणावरून तसेच तिची इच्छा नसताना तिला हॉटेलमध्ये काम करण्यास लावून तिच्याशी वारंवार वाद घालून भांडण करायचा. हाताने मारहाण व शिवीगाळ, दमदाटी करून शारिरीक व मानसिक त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली असा आरोप रोहिणीच्या वडिलांनी केला. तक्रार करतात पोलिसांनी नवरा निलेश विलास पाराध्ये याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. आता पुढील तपास चालू आहे. रोहिणीच्या या निर्णयाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे