Nashik Vidhan Parishad Election : 99.84 टक्के मतदानाने रंगली विधान परिषद निवडणूक; आता उत्सुकता निकालाची

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात तब्बल ९९.८४ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. सुरुवातीला मतदारांचा प्रतिसाद काहीसा मंदावलेला दिसला, मात्र दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढली आणि जवळपास सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.



८ केंद्रांवर १०० टक्के मतदान


या निवडणुकीत एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये ३१९ महिला आणि २९९ पुरुष लोकप्रतिनिधींचा समावेश होता. मालेगाव महापालिकेतील एका नगरसेवकाने मतदान न केल्याने शंभर टक्के मतदानाची संधी हुकली. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांपैकी आठ केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले, तर एका केंद्रावर ९८.८१ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि निकालाकडे लागले आहे.


या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळाल्या. राजकीय मतभेद बाजूला ठेवत मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच संख्याबळ अनुकूल असतानाही संभाव्य क्रॉस व्होटिंग आणि नाराजी टाळण्यासाठी महायुतीने आपल्या मतदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची रणनीती आखली होती.



मतदार संख्या


नाशिक महापालिका - १२२

मालेगाव महापालिका - ८४

मनमाड नगरपरिषद -३५

सिन्नर नगरपरिषद - ३४

येवला नगरपरिषद -३०

पिंपळगाव बसवंत नगरपरिषद - २९

ओझर नगरपरिषद -२८

सटाणा नगरपरिषद -२८

इगतपुरी नगरपरिषद -२४

भगूर नगरपरिषद -२३

त्र्यंबकेश्वर नगरपरिषद - २३

नांदगाव नगरपरिषद - २३

दिंडोरी नगरपंचायत - १९

निफाड नगरपंचायत - १९

कळवण नगरपंचायत - १९

सुरगाणा नगरपंचायत -१९

पेठ नगरपंचायत -१८

देवळा नगरपंचायत -१८

देवळाली छावणी परिषद - १

दरम्यान, उच्चांकी मतदानामुळे आता उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून निकालात कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय