Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात;दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला आणि केली पाहणी 


ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील आर.सी. पाटील पुलाजवळ  (R.C. Patil Bridge)गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Mumbai Nashik Highway Accident)



प्राथमिक माहितीनुसार, एक दाम्पत्य दुचाकीवरून भिवंडीहून ठाण्याकडे जात असताना त्यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Road Accident)

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमीला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी भिवंडी (Bhiwandi) येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा याच मार्गावरून जात असताना त्यांनी अपघातस्थळी थांबून परिस्थितीची माहिती घेतली. जखमीला त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्याचे सांगण्यात आले.



अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून ट्रक चालकाची चौकशी करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Police)
Comments
Add Comment

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.