Mumbai Crime : मुंबईत ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 12 रिक्षांसह दोन आरोपी अटकेत

मुंबई : खेरवाडी पोलीस ठाण्याच्या (Kherwadi Police ) गुन्हे प्रकटीकरण पथकाने ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या 12 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या असून सुमारे 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. (Mumbai Crime News)

खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून सीसीटीव्ही नसलेल्या भागांमधून ऑटोरिक्षा चोरीच्या घटना घडत होत्या. 15 जून रोजी बांद्रा पूर्व येथील कार्डिनल स्कूलसमोरील रस्त्यावर उभी असलेली एक ऑटोरिक्षा चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. (Autorickshaw theft)



घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर मो. इक्बाल सिरताजअली शेख उर्फ लकी (वय 23) आणि मो. फरीद मिराजअली हाशमी (वय 20) हे दोघे संशयित आढळले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. (Mumbai Police)

तपासादरम्यान आरोपी चोरीच्या ऑटोरिक्षांचा वापर बांधकाम साईटवरील भंगार चोरीसाठी करत असल्याचे समोर आले. काम पूर्ण झाल्यानंतर चोरीच्या रिक्षा निर्जनस्थळी लपवून ठेवल्या जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार वाकोला पाइपलाइन (Vakola) परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला आणि विलेपार्ले परिसरातील अनेक ऑटोरिक्षा चोरी केल्याची कबुली दिली.



पोलिसांनी आरोपींकडून एकूण 12 ऑटोरिक्षा जप्त केल्या. या कारवाईमुळे खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यांतील एकूण 10 हून अधिक गुन्ह्यांची उकल झाली आहे.

तपासात मुख्य आरोपी मो. इक्बाल शेख उर्फ लकी याच्यावर यापूर्वीही दरोडा, चोरी आणि इतर गुन्ह्यांचे अनेक दाखले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आरोपींची अधिक चौकशी सुरू असून या टोळीचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. (Police Investigation)

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खेरवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील