Thursday, June 18, 2026

Gold-Silver Price Today : आनंदवार्ता! सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today : आनंदवार्ता! सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : मजबूत होत असलेला रुपया आणि तेजीत धावणारा शेअर बाजार यांचा परिणाम आता सराफा बाजारावर दिसून येत आहे. सोन्याच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली असून, गेल्या तीन दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल ४४० रुपयांची घट झाली आहे. त्याचवेळी २२ कॅरेट सोनेही ४१० रुपयांनी स्वस्त झाले आहे. (Gold-Silver Price Today)

याआधी १५ जून रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यावेळी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅममागे २,४५० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात २,२५० रुपयांची घट नोंदवण्यात आली होती. आज राजधानी दिल्लीत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रत्येकी १० रुपयांची किरकोळ घट झाली आहे. (Gold-Silver Price Today)

अमेरिका-इराण करारावर बाजाराची नजर :

सोने आणि चांदीच्या भावांमधील पुढील चढ-उतार आता अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विश्लेषकांच्या मते, अमेरिका-इराण चर्चेत सकारात्मक प्रगती झाल्यास मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव कमी होऊ शकतो. त्यामुळे ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीची मागणी घटण्याची शक्यता आहे. (Gold-Silver Price Today)

चांदीलाही उतरती कळा :

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे. सलग दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या भावात प्रति किलो १०० रुपयांची घट झाली आहे. याआधी १५ जून रोजी चांदीच्या दरात तब्बल ५००० रुपयांची वाढ झाली होती. (Gold-Silver Price Today)

सध्या दिल्लीमध्ये एक किलो चांदीचा दर २,६४,९०० रुपयांवर आला आहे. मुंबई आणि कोलकाता येथेही चांदी याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचे दर सर्वाधिक असून, तेथे एक किलो चांदीसाठी २,७४,९०० रुपये मोजावे लागत आहेत. (Gold-Silver Price Today)

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे संकेत :

सध्या जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती, रुपयाची मजबुती आणि अमेरिका-इराण संबंधांमधील प्रगती यांचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत सराफा बाजारात आणखी चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Gold-Silver Price Today)

जाणून घ्या आजचे नवीन दर :

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >