Thursday, June 18, 2026

US - Iran Sign Peace Deal : अखेर ११० दिवसांच्या युद्धानंतर ऐतिहासिक करार! ट्रम्प-इराण शांतता करारावर स्वाक्षरी; होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार

US - Iran Sign Peace Deal : अखेर ११० दिवसांच्या युद्धानंतर ऐतिहासिक करार! ट्रम्प-इराण शांतता करारावर स्वाक्षरी; होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार

फ्रान्स : तब्बल ११० दिवस सुरू असलेल्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फ्रान्समधील व्हर्साय पॅलेसमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात या करारावर स्वाक्षरी केली. जी-७ शिखर परिषदेनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनावेळी हा ऐतिहासिक करार पूर्ण झाला. (US - Iran Sign Peace Deal)

या करारामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्यास मदत होणार असून जागतिक ऊर्जा बाजारालाही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मॅक्रॉन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, "हा करार दीर्घकालीन शांततेचा मार्ग मोकळा करेल आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू होण्यास मदत करेल. यामुळे ऊर्जा दर कमी होण्याची शक्यता आहे," असे म्हटले. (US - Iran Sign Peace Deal)

इराणची प्रतिक्रिया: "आता अंमलबजावणीची खरी परीक्षा"

इराणनेही करारावर स्वाक्षरी झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते (Esmaeil Baqaei) इस्माईल बागाई यांनी सांगितले की, "इस्लामाबाद सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता या कराराची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याची परीक्षा सुरू होईल." (US - Iran Sign Peace Deal)

मुळात या करारावर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे शुक्रवारी स्वाक्षरी होणार होती. मात्र प्रक्रिया अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाली आहे. तरीही जिनिव्हा बैठक नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. (US - Iran Sign Peace Deal)

पुढील ६० दिवस निर्णायक :

"इस्लामाबाद मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग" असे या दस्तऐवजाचे अधिकृत नाव असून आता अमेरिका आणि इराण यांच्याकडे अंतिम कराराच्या अटी ठरवण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी असेल. या करारानुसार अमेरिका ३० दिवसांच्या आत इराणवरील नौदल नाकेबंदी हटवेल. त्यानंतर समुद्री वाहतूक युद्धापूर्वीच्या पातळीवर पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. अंतिम करार झाल्यानंतर ३० दिवसांत अमेरिकन सैन्य इराणच्या आसपासच्या भागातून माघार घेईल, असेही या करारात नमूद करण्यात आले आहे. (US - Iran Sign Peace Deal)

दुसरीकडे, इराणने पुढील ६० दिवस कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. (US - Iran Sign Peace Deal)

११० दिवसांच्या युद्धाचा शेवट :

फेब्रुवारी २८ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर संघर्षाची ठिणगी पडली होती. त्यानंतर जवळपास ११० दिवस चाललेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. मात्र आता या शांतता करारामुळे संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जागतिक राजकारण आणि ऊर्जा बाजारासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या कराराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून पुढील ६० दिवसांत त्याची अंमलबजावणी किती प्रभावी होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (US - Iran Sign Peace Deal)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >