NCP (AP) :भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष अर्जुन मेघे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई: भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री स्वर्गीय दत्ता मेघे यांचे चिरंजीव अर्जुन मेघे यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले असून, या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



पक्षप्रवेश सोहळा


मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. अर्जुन मेघे यांनी आपल्या समर्थकांसह पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेला मोठी बळकटी मिळाली आहे.



कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:




  • इंद्रनील नाईक: राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस




  • संजय खोडके: ज्येष्ठ नेते तथा आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस




  • धीरज शर्मा: राष्ट्रीय युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस




  • उमेश पाटील: नेते, राष्ट्रवादी काँग्रेस




  • सुरज चव्हाण: प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस




  • लतिफ तांबोळी: प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस






नेत्यांची प्रतिक्रिया


पक्षप्रवेशावेळी मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि स्वतः अर्जुन मेघे यांनी आपले विचार मांडले. अर्जुन मेघे यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात पक्षातर्फे त्यांच्यावर कोणती महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक