'UBT' MLA : खासदारांपाठोपाठ उबाठाचे २० आमदार फुटणार? लोकसभेतील भूकंपाने नगरसेवकांमध्येही अस्वस्थता वाढली

मुंबई : उबाठा गटाच्या ६ खासदारांनी बंडाचे निशाण फडकावून 'ऑपरेशन टायगर' फत्ते केल्यानंतर आता २० आमदारही 'मातोश्री'ची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्यांदा खिंडार पाडल्यामुळे उबाठा गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, आमदारांसह मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांमध्येही चलबिचलता वाढली आहे.



शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी, "उद्धव ठाकरेंनी आधी मुंबईतील आपले ६५ माजी नगरसेवक त्यांच्याकडे सुरक्षित राहतात की नाही हे पाहावे," असा गर्भित इशारा दिल्यामुळे या फुटीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे जे प्रमुख आमदार निवडून आले होते, त्यांच्यामध्ये आता लोकसभेतील घडामोडींमुळे प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मतदारसंघात विकासकामांसाठी लागणारा निधी आणि राजकीय भवितव्याच्या चिंतेपोटी या आमदारांच्या संभाव्य हालचालींविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.



एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही दिवसांत उबाठाचे दोन तृतीयांश खासदार आपल्या बाजूला वळवून त्यांची संसदेतील ताकद संपवून टाकली आहे. त्यामुळे उबाठा गटात कमालीचे वैफल्य आले आहे. खासदार हातचे गेल्यानंतर आता आमदार आणि नगरसेवकांची ही संभाव्य गळती रोखण्यासाठी उबाठाने 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दोन दिवसांत मुंबईत उबाठाच्या सर्व आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक 'मातोश्री'वर बोलावली जाणार आहे.
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक