अहिल्यानगर : जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याने जूनच्या पहिल्याच आठवड्यात तळ गाठला असून, एकूण साठा अवघ्या २४.५४ टक्क्यांवर घसरला आहे. वाढते बाष्पीभवन, रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात झालेला पाण्याचा वापर, बिगरसिंचनासाठी सोडलेले आवर्तन तसेच पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
NEET-UG 2026 पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती ...
जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे यांसह सर्व धरणांमध्ये सध्या केवळ १२ हजार ५३८ दशलक्ष घनफूट इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या फक्त २४.५४ टक्के आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५ हजार ८६२ दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास पावणेसहा टीएमसीने पाणी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ऑगस्टपर्यंत भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणे ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. सप्टेंबरमध्येही मुसळधार पावसामुळे भूजलपातळीत वाढ झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट दिसून येत आहे.
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील विकासकामे मात्र दिरंगाईने सुरु असल्याचे चित्र आहे. अशातच आता मनपा आक्रमक झाली ...
उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणावर झालेले बाष्पीभवन यामुळे धरणांतील साठा झपाट्याने घटला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून, सिंचन व बिगरसिंचनासाठीही आवर्तन सुरू आहे. त्यामुळे अनेक धरणांनी जूनमध्येच तळ गाठल्याचे चित्र आहे.
धरणांतील शिल्लक पाणी तसेच कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्हाभरातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले असून, नद्या, तलाव व इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणीउपसा करणार्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने पर्जन्यमान घटण्याची भीती असून, अद्याप मान्सून दाखल न झाल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.
नाशिक : सायबर गुन्हेगार (Cyber criminals) नागरिकांना लुटण्यासाठी नवनवीन फंडे शोधत असतात. आता या डिजिटल चोरांनी चोरीचा नवा फंडा शोधला आहे. ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) ...
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष घनफूट/टक्केवारी):
भंडारदरा – २३६५ (२१.४२%)
निळवंडे – १९८२ (२३.८२%)
मुळा – ६७६६ (२६%)
आढळा – ३७४ (३५%)
सीना – ८१६ (३४%)
खैरी – १०५.३५ (१९.७७%)
विसापूर – १०३.२८ (११.४१%)
घाटशीळ – ९४ (२१.५१%)
मांडओहळ – ४८.७६ (१२.२२%)
घाटशीळ – ९४ (२१.५१%)






