Navnath Ban : उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही

 मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या शिवबंधनात वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही. आणाभाका देऊन वा शिवबंधन बांधून आमदार, खासदार टिकत नाहीत तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे बंधन लागते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्त्यांबद्दल ना प्रेम उरले, ना माणुसकी उरली, ना आपुलकी. त्यामुळे उबाठा गटाचे आमदार, खासदार सातत्याने पक्ष सोडून प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बंधनात अडकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शपथा, शिवबंधनाला काहीही अर्थ नाही हे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



उद्धव ठाकरे लोकप्रिय आहेत आणि ते सर्वांना भेटतात, असे सांगणे हा या दशकातला सर्वात मोठा विनोद आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या आमदार, खासदारांना मातोश्रीच्या दरवाजातून परत पाठवतात. मुळात संजय राऊतांनाही अनेकदा मातोश्रीत प्रवेश मिळत नाही हे वास्तव आहे. हा विनोद कॉमेडी सर्कसमध्ये सांगितला तर प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होईल, असे म्हणत  बन पुढे म्हणाले की ज्यांना प्रत्येक गोष्ट पैशांत मोजायची, भ्रष्टाचार करायची सवय आहे. असेच लोक खरेदीविक्रीची भाषा करणार. मुळात खरेदीविक्री करण्याचा अनुभव संजय राऊत यांना जास्त असेल. कारण पत्राचाळीत मराठी माणसांना देशोधडीला लावून खरेदीविक्री कोणी केली याचे उत्तर एकदा संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे.




संजय राऊत तुमच्या हातात ईडी, सीबीआय आणि न्यायालय दिले तरी तुमच्यासोबत एकही माणूस टिकणार नाही. नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची सीबीआयकडून बारा – बारा तास चौकशी करण्यात आली होती. अमित शाह यांना तडीपार करण्यापर्यंत काँग्रेस सरकारची मजल गेली होती. परंतु ना अमित शाह यांनी भाजपा सोडली, ना नरेंद्र मोदीजींनी. आमचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि देवेंद्रजी फडणवीस यांना अनेक खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही अनेक आमदार, नगरसेवकांना फोडण्यासाठी प्रयत्न केले. पण तुम्ही साधा एकही नगरसेवकही फोडू शकला नाहीत. ईडी - सीबीआयचा गैरवापर करून माणसे तोडता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांना भेटावे लागते. बोलावे लागते, त्यांना संधी द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या वाटेवर आला ते बघा, असेही श्री. बन यांनी नमूद केले .



विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने तुमच्या थोबाडीत मतरूपी जोडे मारले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या कानशिलात जोडे मारलेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तर भोपळा देऊन तुमच्या पक्षाला, तुमच्या पक्षप्रमुखाला आणि संजय राऊत तुम्हालाही लोकांनी मारले ते व्रण अजूनही पुसले गेलेले नाहीत. त्यामुळे जनतेचा असा अपमान करत असाल तर जनता तुम्हाला आणखी जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही, असे बन यांनी सुनावले.




अभिजीत दिपके यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या आंदोलनाला विरोध असेल तर आंदोलनाच्या मार्गाने किंवा लोकशाही पद्धतीने त्याला प्रतिकार करता येतो. परंतु अशा पद्धतीने कोणाला मारहाण करण्याचे समर्थन भाजपा कधीही करत नाही, असेही बन यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी'

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना