Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे दादांच्या शिकवणीत बसत नाही. म्हणून दादांनी पाहिलेले हे प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे. आज आपण ॲपचे उद्घाटन करत नाही तर एका दूरदृष्टीला पुढे घेऊन जात आहोत. त्याच दूरदृष्टीवर आदरणीय दादांचा विश्वास होता असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्या प्रेरणेतून आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दादा उद्योगिनी’ आणि ‘NCP युथ स्कील’ या दोन्ही ॲपचे लोकार्पण झाले.



‘दादाज उद्योगिनी’च्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढं जाण्यासाठी संधी आणि कौशल्याला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन मिळणार असून, ‘NCP यूथ स्किल्स’च्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. अजित पवारांच्या जाण्याने माझ्या तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कुणीच कधी भरुन काढू शकत नाही. एका क्षणात आपण सगळेच पोरके झालोत पण मी तुमच्या डोळ्यात पहाते तेव्हा मला रडायचे नाही तर लढायचे बळ मिळते असा आत्मविश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.



पुण्यात हा कार्यक्रम होत आहे याचा एकादृष्टीने वेगळाच अर्थ आहे. कारण महिलांच्या शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून पहिली शाळा पुण्यात सुरू झाली आणि तरुणांच्या स्वप्नांना आकार देणारी शेकडो महाविद्यालये, उद्योग स्टार्टअप आणि सगळ्याच गोष्टी पुण्यात उभ्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस नवीन सुरुवात करण्यासारखा आहे आणि एक नाविन्यपूर्ण सुरुवात आपल्या महिलांच्या आणि युवकांच्या जीवनात या अ‍ॅपने होणार आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.



लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे आदींनी आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार पार्थ पवार, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजी गर्जे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे,पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, युवती प्रदेशाध्यक्ष निर्मला नवले, आमदार सुनील शेळके,आमदार विक्रम काकडे, आमदार चेतन तुपे, आमदार माऊली कटके, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवती, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष