Devendra Fadnavis : NAFA 2026 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; सॅन होजेत रंगणार मराठी संस्कृतीचा जागतिक महोत्सव

मुंबई : उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय समुदायासाठी महत्त्वाचा ठरलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिव्हल 2026’ (NAFA) ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. NAFAचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना या महोत्सवाचे निमंत्रण दिले.


कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान तिसऱ्या NAFA फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी NAFAच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. यावेळी एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, डॉ. गौरी घोलप आणि अभिजीत घोलप उपस्थित होते.


NAFA फिल्म फेस्टिव्हल हा केवळ चित्रपट महोत्सव नसून मराठी संस्कृती, कला आणि जागतिक मराठी समुदायाला जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक मंच म्हणून ओळखला जातो. दरवर्षी भारतातील अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर या महोत्सवात सहभागी होत असतात. गतवर्षी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती.



यंदाच्या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक महेश मांजरेकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेत्री श्रुती मराठे, गिरिजा ओक यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी NAFA Stream OTT या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी असे व्यासपीठ महत्त्वाचे असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावर आपली कलाकृती पोहोचवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकवर्ग अधिक विस्तारण्यास मदत होईल.


NAFAचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी सांगितले की, "NAFA हा केवळ चित्रपटांचा उत्सव नसून मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती आणि जागतिक कलावंतांना जोडणारा सशक्त सांस्कृतिक पूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमंत्रण स्वीकारण्याची सकारात्मक भूमिका घेतली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. उत्तर अमेरिकेतील हजारो मराठी आणि भारतीय रसिक त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत."



उत्तर अमेरिकेतील मराठी समाजामध्ये यंदाच्या NAFA फिल्म फेस्टिव्हलबाबत मोठा उत्साह असून, हा महोत्सव मराठी संस्कृती, कला आणि जागतिक मराठी ऐक्याचा भव्य सोहळा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर