IAF Officer Wife Video : धक्कादायक! हवाई दल अधिकाऱ्याच्या पत्नीचा बलात्कार, ब्लॅकमेल आणि सक्तीच्या धर्मांतराचा आरोप

नागपूर : नागपुरात (Nagpur) एका २४ वर्षीय महिलेने तिच्या जुन्या वर्गमित्रासह तिघांविरुद्ध बलात्कार (Rape), ब्लॅकमेल (Blackmail), खंडणी (Extortion) आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न (Attempted forced conversion) केल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Arrest) केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. (Crime News)


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अय्याज ताज मडारे (वय २६) आणि अमीन शेख (वय ३०) अशी आहेत. तर मध्य प्रदेशातील तामिया येथील रहिवासी असलेल्या हजरत मौलाना याचा पोलीस शोध घेत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला प्रॉपर्टी डीलिंगचे काम करते, तर तिचे पती भारतीय हवाई दलात अधिकारी आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी अय्याज मडारे याने प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्याचा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे फोटो व व्हिडिओ चित्रीत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.



पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने या व्हिडिओंच्या आधारे तिला वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच तिच्याकडून सुमारे ३.०९ लाख रुपये उकळल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


तक्रारीनुसार, आरोपी महिलेवर धर्मांतरासाठी सतत दबाव टाकत होता. ३१ मे रोजी तिला कळमेश्वर परिसरातील एका निर्जन स्थळी नेण्यात आले. तेथे अमीन शेख आणि हजरत मौलाना यांची ओळख करून देत काही धार्मिक विधी करण्यात आले. या विधींनंतर तिचे धर्मांतर झाल्याचा दावा करण्यात आला, असा आरोप महिलेने केला आहे.


दरम्यान, या घटनेशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला मदतीसाठी ओरडताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता आणि त्याचा प्रकरणाशी संबंध याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.



पीडितेचे पती कर्तव्यावरून घरी परतल्यानंतर तिने संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, खंडणी, सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून तक्रारीतील सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या