NEET-UG 2026 पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) भारतात टेलिग्रामच्या वापरावर तात्पुरते निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून, ही बंदी 22 जूनपर्यंत लागू राहणार आहे. (Telegram Temporary Ban)
NTA च्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने टेलिग्रामवरील ‘मेसेज एडिट’ (संदेश संपादन) हे फीचरही 30 जूनपर्यंत भारतात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या फीचरचा गैरवापर करून काही चॅनेल्स आणि ग्रुप्सकडून परीक्षा संपल्यानंतर जुन्या पोस्टमध्ये प्रश्नपत्रिका जोडून त्या आधीच लीक झाल्याचा खोटा दावा केला जात असल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. (Telegram Temporary Ban)
नागपूर : नागपुरात (Nagpur) एका २४ वर्षीय महिलेने तिच्या जुन्या वर्गमित्रासह तिघांविरुद्ध बलात्कार (Rape), ब्लॅकमेल (Blackmail), खंडणी (Extortion) आणि सक्तीने धर्मांतर ...
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही टेलिग्राम चॅनेल्स परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांकडून हजारो ते लाखो रुपये उकळत होते. NTA ने अशा सर्व दाव्यांना फसवणूक ठरवत विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ची महत्त्वाची भूमिका असल्याचे NTA ने सांगितले. यापूर्वीच अनेक बनावट टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्स हटवण्यात आले आहेत. (Telegram Temporary Ban)
NTA ने स्पष्ट केले आहे की, NEET प्रश्नपत्रिका सुरक्षित यंत्रणेबाहेर उपलब्ध नसते आणि सोशल मीडिया किंवा मेसेजिंग अॅप्सवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही पेपरफुटीच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांनी परीक्षा संदर्भातील माहिती केवळ NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरून आणि अधिकृत घोषणांमधूनच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जी-७ शिखर परिषदेत (G-7 Summit) सहभागी होण्यासाठी मंगळवारी फ्रान्समधील एव्हियन (Evian) येथे दाखल होणार आहेत. त्यांच्या दोन ...
टेलिग्रामवरील निर्बंध हे तात्पुरते असल्याचे सांगत NTA ने स्पष्ट केले की, २२ जूननंतर सेवा पूर्ववत करण्यात येईल. तसेच मेसेज एडिट फीचर बंद असले तरी वापरकर्ते नवीन संदेश पाठवू आणि प्राप्त करू शकतील. NTA ने विद्यार्थ्यांना आश्वस्त करत सांगितले की, २१ जून रोजी होणारी NEET-UG 2026 पुनर्परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असून परीक्षेची सुरक्षा आणि पारदर्शकता अबाधित राहील. (Telegram Temporary Ban)