Dilip Prabhavalkar : ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचा विशेष गौरव

- नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला शासन मदत करणार


मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेत्री स्वाती चिटणीस (Swati Chitnis) यांचा विशेष गौरव करण्यात आला.


महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या प्रमुख उपस्थिती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले, “नाट्य परिषदेचे काम कलाकार शोधणे, त्यांना घडवणे आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून देणे यासाठी मराठी नाट्य परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रम 'नाट्यकला अकादमी' सांस्कृतिक विभाग तन, मन आणि धनाने ठामपणे पाठिंबा देईल व सोबत काम करेल. बेस्टच्या काही आगारांमध्ये नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उभारण्याचा आमचा मानस आहे”. तसेच महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात दरवर्षी ५ टक्के वाढ न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.


अभिनेत्री स्वाती चिटणीस (Swati Chitnis) यांनी पुरस्कारा नंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, रंगभूमीच्या सुंदर या प्रवासात रंगभूमीशी माझं नातं अनेक पदरांनी समृद्ध होत गेलं. रंगभूमी माझी गुरू आहे, माझी मैत्रीण आहे. या रंगमंचाने मला सुखाची उभारी दिली, अनेक आयुष्यं जगण्याची संधी दिली. दुःख खोलवर समजून घ्यायला आणि ते वाटून घ्यायला शिकवलं. नाटक मनाच्या जखमा भरून काढू शकतं. नाटक नटाला आरसा दाखवतं. रंगभूमीने मला बोलण्याची ताकद दिली, तर समोरच्याचं ऐकण्याची नम्रताही शिकवली. हा पुरस्कार केवळ माझा नाही. मला पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच; पण त्याहून मोठा आनंद म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीत माझा जन्म झाला याचा अभिमान आहे. ज्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला त्या निर्मात्यांचा, दिग्दर्शकांचा, सहकलाकारांचा आणि माझ्या कुटुंबीयांच्या प्रोत्साहनाचा या यशात मोठा वाटा आहे. पडद्यामागे काम करणाऱ्या सर्व कलावंतांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः मराठी रंगभूमीवर बॅकस्टेज काम करणारे ज्या जिव्हाळ्याने आमची काळजी घेतात, त्याची नोंद घेतलीच पाहिजे.



रंगभूमी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रंगभूमीच्या सगळ्या माध्यमांची मुशाफिरी करता आली याचा आनंद आहे. माझी जडणघडण रंगभूमीमुळेच झाली; मी घडलो तो रंगभूमीमुळे या पुरस्कारात माझ्या सहकलाकारांचाही मोठा वाटा आहे. प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते, तसेच पुरस्कारही काहीतरी देऊन जातो. भूमिका माणसाला डोळस बनवते, तर पुरस्कार विनम्र बनवतो. अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यक्त केली.


याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभाग, सचिव डॉ. किरण कुलकर्णी, नाट्य परिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. गिरीश गांधी, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय गोखले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला होती.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित भुरे यांनी केले. अध्यक्ष, प्रशांत दामले (Prashant Damale) यांनी नाट्य परिषदेची भूमिका याप्रसंगी व्यक्त करत सांगितले की, नाट्यपरिषद पुढील काळात रंगकर्मींसाठी विविध योजना घेऊन येणार आहे. रंगमंच कामगार, बुकिंग क्लार्क व्यवस्थापक व कलावंत यांचा अपघाती विमा नाट्य परिषद काढत आहे.


कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले ते "मर्म बंधातली ठेव ही" या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. स्वरगंधर्व मा. दीनानाथ मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या नाट्यगीतांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांना सुरेल आनंदाची अनुभूती देण्यात आली. तसेच स्वरस्वामिनी आशा भोसले यांना संगीतबद्ध आदरांजली वाहण्यात आली.



मराठी रंगभूमीच्या जतन - संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या उपक्रमाला नाट्यप्रेमी, कलावंत आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलावंतांचा गौरव आणि नाट्यसंगीताच्या सुवर्ण परंपरेचे दर्शन घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.


या कार्यक्रमासाठी कोषाध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर , शिवाजी शिंदे, विजय सूर्यवंशी व परिषदेच्या इतर कार्यकर्त्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के