Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली ?

Raja Shivaji Final Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या धमाकेदार चित्रपटांची मेजवानी एकामागोमाग एक पहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट देखील त्या मेजवानीतलाच एक महत्त्वाचा पैकीच एक. 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत मोठे यश मिळवले आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखच्या या ऐतिहासिक चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर कमाईच्या बाबतीतही अनेक मोठं मोठे विक्रम मोडीत काढले आहे.



बॉक्स ऑफिसवर किती कमाई ?


राजा शिवाजी हा चित्रपट सुमारे 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा मराठी चित्रपट मानला जातो. बजेट मोठे असल्याने या चित्रपटासमोर कमाईचे देखील मोठे आव्हान होते. मात्र चित्रपटाने अपेक्षेपेक्षाही सरस कामगिरी करत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला.


चित्रपटाने प्रदर्शित होताच भारतात 12.4 कोटी रुपयांची ओपनिंग केली. आणि इथेच पहिला रेकॉर्डही तोडला कारण मराठी चित्रपटांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी ओपनिंग ठरली गेली. त्यानंतरही चित्रपटाची कमाई सातत्याने सुरूच राहिली. उत्तम कथा, प्रभावी अभिनय, भव्य सेट आणि जोडीला भन्नाट संगीतामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला मोठी पसंती दिली.



बॉक्स ऑफिस कलेक्शन 129.7 कोटी रुपये


संपूर्ण थिएटर रनमध्ये 'राजा शिवाजी'ने भारतात 105.68 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तर भारतातील ग्रॉस कमाई 124.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. परदेशातूनही चित्रपटाने 5 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे एकूण जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शन 129.7 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले.कमाईच्या तुलनेत पाहता, 75 कोटी रुपयांच्या बजेटवर चित्रपटाने 30.68 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. म्हणजेच गुंतवणुकीवर सुमारे 40.9 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी' हा यशस्वी झाला आहे.


'राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. मराठी चित्रपटसृष्टीसाठी 'राजा शिवाजी'चे हे यश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मोठ्या बजेटचे, भव्य ऐतिहासिक चित्रपट मराठीतही यशस्वी होऊ शकतात, हे या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीत आणखी मोठ्या आणि दर्जेदार ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत