Legal notice served to Amazon : महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबन प्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!


मुंबई : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ 'आर्यभट्ट' यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन पातळीवर विडंबन केल्याप्रकरणी ई-कॉमर्स क्षेत्रातील नामांकित कंपनी 'ॲमेझॉन इंडिया'ला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणाऱ्या हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी ही नोटीस बजावली असून ॲमेझॉनने ४८ तासांत भारतीय जनतेची जाहीर माफी मागून ही वादग्रस्त जाहिरात तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास ॲमेझॉन विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा नोटीसच्या माध्यमातून दिला आहे. दरम्यान या जाहिरातीमुळे देशभरातील राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, सामाजिक माध्यमांवर ॲमेझॉन वर बहिष्काराची (#Boycott_Amazon) ऑनलाईन मोहीम प्रचंड वेगाने पसरत आहे.


या जाहिरातीत आर्यभट्ट यांच्या वेशातील एका व्यक्तीला उभे करून त्यांना ‘शून्य डिलिव्हरी चार्जेस शोधणारा शास्त्रज्ञ’ अशा उपरोधिक आणि विनोदी स्वरूपात सादर करण्यात आले आहे. ज्या थोर ऋषितुल्य शास्त्रज्ञाने जगाला ‘शून्याची’ अमूल्य संकल्पना दिली आणि भारताचा वैज्ञानिक ध्वज जगभरात फडकावला, त्यांना केवळ एका व्यावसायिक फायद्यासाठी ‘कॉर्पोरेट मस्कट’ (विनोदी व्यावसायिक पात्र) बनवून त्यांची क्रूर थट्टा उडवणे हा भारताच्या महान ज्ञान-वारशाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा जाणीवपूर्वक केलेला अवमान असल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.



व्यावसायिक फायद्यासाठी भारतीय संस्कृती आणि हिंदू प्रतीकांचा अवमान करण्याची ॲमेझॉनची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची चित्रे असलेले पायपुसणे, टॉयलेट सीट कव्हर्स विकणे, तसेच ‘तांडव’ वेबसिरीजच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तीव्र विरोधानंतर कंपनीला माफी मागावी लागली होती. केवळ व्यावसायिक लाभासाठी भारतीय राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचे हे कृत्य सुधारित भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २९९ (धार्मिक भावना दुखावणे), कलम १९६ व १९७ (समाजात तेढ निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणे) आणि कलम ३०२ (धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू) अन्वये थेट फौजदारी व दिवाणी कारवाईस पात्र ठरते, याकडे नोटिशीतून लक्ष वेधण्यात आले आहे.(FIFA WORLDCUP 2026 )



या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने ॲमेझॉनला अटी पूर्ण करण्यासाठी ४८ तासांचा मुदत दिली आहे. त्यानुसार ही वादग्रस्त जाहिरात यु-ट्यूब, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि टेलिव्हिजनसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कायमची हटवण्यात यावी; कंपनीने आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवर, वेबसाईटच्या मुख्य पानावर आणि देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहीर व बिनशर्त माफी मागावी; तसेच भविष्यात राष्ट्रीय प्रतीकांचा वा राष्ट्रपुरुषांचा अवमान न करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत या मागण्या पूर्ण न झाल्यास, न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा समितीच्या अ‍ॅड्. अमिता सचदेवा यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे